Advertisement

झिरो श्याडो डे' तसेच सोलर फिल्टर चष्म्यातून सूर्याच्या दाहकतेचा अनुभव घेताना ग्रीनफ्रेंड्सचे सदस्यग्रीनफ्रेंड्स तर्फे "शून्य सावली दिवस" साजरा



'झिरो श्याडो डे' ला सर्वानी  अनुभवली काही क्षण अदृश्य  झालेली सावली

 "आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिना"ची सुद्धा दिली माहिती

सोलर फिल्टर चष्म्यातून अनुभवली सूर्याची दाहकता

लाखनी:- 
    ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे "शून्य सावली दिवस" अर्थात 'झिरो श्याडो डे' निमित्त उपक्रम घेण्यात आला. आयुष्यभर सोबत राहणारी सावली सुद्धा भर उन्हात कशी साथ सोडते याचे अनुभव  प्रात्यक्षिकाद्वारे 12 वाजून 7 मिनिटांनी सर्वांना अनुभवता आले. यावेळी ठेवलेल्या वस्तू उदाहरणार्थ प्लास्टिक पाइप,रॉड यांची सावली काही क्षण गायब झाली त्याचबरोबर उभे असलेले सर्व ग्रीनफ्रेंड्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांची सावली रुंदावत पायाखाली कशी काही क्षण विसावली हे अनुभवता आले.यावेळी ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह व खगोल अभ्यासक प्रा.अशोक गायधने यांनी सर्वांना सोलर फिल्टर चष्म्यातून भर दुपारी प्रखर उन्हात सूर्यदर्शन करवून सूर्याची दाहकता सुद्धा अनुभवून दिली.या उपक्रमाला अ. भा.अंनिस तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा तसेच नेफडो जिल्हा भंडारा यांचे सुद्धा सहकार्य लाभले.
  या भौगोलिक घटनेविषयी खगोलशास्त्रानुसार अधिक माहिती देताना ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह व खगोलअभ्यासक  प्रा.अशोक गायधने यांनी सांगितले की  पृथ्वी आपल्या कक्षेत स्वतःच्या आसाभोवती 23.50 अंशावर कलल्याने सूर्याचा उत्तरायण व दक्षिणायन असे दोन भासमान मार्ग 23.50 अंशावर तयार झाले आहेत .उत्तरायण असताना भारतात मे महिन्यात व दक्षिणायन असताना डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण नसताना हे 'शून्य सावली दिवस' कर्कवृतांमधील प्रदेशात आपण अनुभवू शकतो.कर्कवृतांपलीकडील तसेच मकरवृतापलीकडील भूभागावर आपण 'झिरो श्याडो डे' अनुभवू शकत नाही याची पण माहिती त्यांनी पुरविली. प्रत्येक अक्षवृत्तावर सूर्य दोन दिवस भ्रमंती करत असल्याने यावर्षी भंडारा जिल्ह्यात 26 मे व 27 मे यादिवशी हे दिवस  "झिरो श्याडो डे" किंवा "शून्य सावली दिवस" म्हणून अनुभवता आले. पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती  23.50अंशावर कलण्याचे कारण त्यांनी सर्वांना सोदाहरण पटवून दिले.यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने पृथ्वीवरील जैवविविधता प्राणी पक्षी,कीटक,सरपटणारे प्राणी याबद्दल विस्तृतपणे माहिती पुरविली. 'हिरवी पृथ्वी' चा संबंध पृथ्वीच्या कलण्याशी, पुढे ऋतु निर्माण होणे,दिवस -रात्र चक्र आणि पाणी हवा जमीन हे आवश्यक घटकांची निर्मिती याच्याशी घटनासंबंध जोडून दाखविला व यातून सजीवसृष्टी घडत गेली हे जैवविविधता दिनानिमित्ताने सोदाहरण स्पष्ट केले.
  'झिरो श्याडो डे' तसेच 'आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिना'च्या संयुक्त कार्यक्रमाला प्रा.अर्चना गायधने ,अथर्व गायधने,अमोली बडवाईक ,तेजस भुरे,अर्णव गायधने,सार्थक निखाडे,सुमित्रा गायधने, शौर्य निखाडे,माही भुरे,शारदा निखाडे,शरयू निखाडे यांनी सहभाग नोंदविला.

Post a Comment

0 Comments