Advertisement

गृहअर्थशास्त्र विभागातर्फे मुरमाडी येथे 'शिका व कमवा' कार्यक्रमाचे आयोजन

*स्व.नि.पा.वाघाये महाविद्यालय मुरमाडी/ तुपकर येथे 'कॅन्टीन ऍक्टिविटी' चा अभिनव उपक्रम*

*महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी स्वहस्ते तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची विक्री*

*याद्वारे त्यांना मिळाला स्वयंरोजगाराचा मार्ग*

लाखनी:-
      .लाखनी तालुक्यातील मुरमाडी तुपकर येथे असलेल्या स्व.निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालयाच्या गृहअर्थशास्त्र विभागातर्फे 'शिका व कमवा' तसेच 'कॅन्टीन ऍक्टिव्हिटी' हा उपक्रम घेण्यात आला.'शिकताना कमवा' ह्या उपक्रमाअंतर्गत विविध गृहोपयोगी खाद्यपदार्थ महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ अर्चना निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले.या विविध गृहोपयोगी तसेच खाद्यपदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉल महाविद्यालय परिसरात लावण्यात आले.या अभिनव अशा 'खाद्यपदार्थ प्रदर्शन व विक्री स्टॉल्स'चे उदघाटन प्रभारी प्राचार्य भेदराज ढवळे यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. उदघाटनप्रसंगी प्रा डॉ. श्रीकांत भुसारी , प्रा.विश्वास खोब्रागडे, प्रा विशाल गजभिये,प्रा डॉ. भूमेश्वरी वाघाये यांची प्रमुख उपस्थिती होती.
  यावेळी गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अर्चना निखाडे यांनी गृहोपयोगी दीर्घकाळ टिकणारे कोरडे खाद्यपदार्थ व अभ्यासक्रमांतर्गत असलेले ताजे अन्नपदार्थांची माहिती,लागणारे साहित्य व पोषणमूल्य यांची इत्यंभूत माहिती सर्वाना दिली. ,गृहअर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींनी विविध ताजे पदार्थ व दीर्घकाळ टिकणारे स्वहस्ते तयार केलेल्या पदार्थांची विक्री सर्व उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापक -कर्मचारी वर्गांना करून चांगला नफा प्राप्त केला. स्वहस्ते तयार केलेल्या या विविध आकर्षक व उत्तम पॅकिंग केलेले दीर्घकाळ टिकणारे खाद्यपदार्थ जसे विविध प्रकारचे पापड,शरबत,लोणचे,जॅम,शेवया, वळया,कुरड्या,चिप्स,विविध भाज्यांची भुकटी तसेच तयार केलेले ताजे अन्नपदार्थ जसे व्हेज पुलाव,सत्तू लाडू,इडली सांबर,शेंगदाणा खजूर लाडू,फ्रुट चाट,कटलेट्स, पावभाजी, सँडविच, अप्पे तसेच उष्णताशमक पदार्थ जसे विविध फळांचे ज्यूस, आंब्याचा पन्हा, ताक ,लस्सी आणि औषधी व पोषणयुक्त इत्यादी पदार्थांची आकर्षक मांडणी कॅन्टीन ऍक्टिव्हिटीअंतर्गत केली गेली. यानंतर अनेकांनी या पदार्थांची खरेदी करून विद्यार्थ्यांना 'शिका व कमवा' योजनेचा प्रत्यक्ष आनंद दिला.
  प्राचार्य भेदराज ढवळे यांनी याप्रसंगी विद्यार्थिनींनी अशा उपक्रमाद्वारे शिकता शिकता स्वतःच्या पायावर उभे कसे रहावे याकरिता प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. तसेच गृहअर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनींची गृहोपयोगी खाद्यपदार्थ प्रदर्शन व विक्री स्टॉल तसेच कॅन्टीन ऍक्टिव्हिटीच्या आयोजनाबद्दल प्रशंसा केली.सर्व उपस्थित प्राध्यापकांनी सुद्धा आपले उत्तम अभिप्राय नोंदवून विद्यार्थ्यांना याद्वारे स्वयंरोजगाराचा मार्ग प्राप्त होऊ शकतो याबद्दल प्रोत्साहित केले.
  'शिकताना कमवा' योजनेच्या या अभिनव अशा गृहअर्थशास्त्र विभागाच्या उपक्रमाकरिता गृहअर्थशास्त्र विभागाच्या तिन्ही वर्षातील महाविद्यालयीन युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.विशेषतः रिना बिसनकर,निशा पुराम, किरण देशपांडे,सुप्रिया देशपांडे, रुपाली लांजेवार, श्वेता खांडेकर, आचल बोंदरे,साधना राऊत,दामिनी जगनाडे,पूजा पंधरे,प्रियंका लांजेवार, रुपाली चचाणे, त्रिवेणी कठाणे, माहेश्वरी कठाणे,योगिता गायधने इत्यादींनी खाद्यपदार्थ तयार करून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संचालन कु.दिलेश्वरी मानकर तर आभार प्रदर्शन सुनंदा वनवे हिने केले.
       कार्यक्रम आयोजनाकरिता ग्रंथपाल प्रा.विशाल गजभिये, प्रा.डॉ.राहुल चुटे,प्रा.महिंद्र फुलझेले,प्रा.स्नेहा श्यामकुवर,गीतेश्वरी तरोणे,खेमराज वाघाये,श्रीकांत धुर्वे,अजय मेश्राम व परिचर अमर जांभुळकर, शोएब शेख,तेजेंद्र सदावर्ती ,किशोरी नानोरे,देवेंद्र मेंढे यांच्यासमवेत गृहअर्थशास्त्र विभागाने अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments