Advertisement

साकोली:-बॉटलच्या तुकड्यामध्ये फसलेल्या धामण सापाचा रेस्क्यू

      आज दिनांक 31/05/2022 साकोली जवळ 2 किमी असलेल्या गडकुंभली येथे (जिल्हा भंडारा) तुषार डडेमल यांच्या घरी सकाळी 7:30 वाजता धामण जातीचा बिनविषारी साप बॉटलच्या तुकड्यात फसलेला  आढळुन आला..या सापाची ८ फुट लांबी होती. हा साप काही दिवसांपासून बॉटलच्या तुटलेल्या छोट्या भागात घट्ट फसल्याने त्याला हालचालींसाठी त्रास होत होता. त्याजागची त्वचा घट्ट दबल्याने पाठीचा नाजूक कण्याला इजा पोहचलेली होती.. ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब साकोलीचे निसर्गमित्र युवराज बोबडे तसेच सर्पमित्र रोशन बागडे , तुषार डडेमल, आकाश बारसागडे, प्रणय टेकाम हया सर्वांनी मिळून त्या सापाला वाचविण्यासाठी  बॉटलचा तूकडा काळजीपूर्वक कापून जीवदान दिले.सापाला रेस्क्यू करत असताना सापाने सर्पमित्र रोशन बागडे यांच्या हाताला कड़कडून चावा घेतला परंतु सर्पमित्राच्या सावधगिरीने कुठलीही हानी झाली नाही. त्यानंतर धामण सापाला नागझीरा जंगलामध्ये सोडण्यात आले. ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी सर्पमित्राच्या या तत्पर निसर्गसेवेबद्दल अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले.ग्रीनफ्रेंड्सचे निसर्गमित्र  युवराज बोबडे,रोशन बागडे,गोविंदा धुर्वे ,सुरेंद्र राऊत व त्यांच्या टीमचे इतर सदस्य मागील 5 वर्षांपासून साकोली तालुक्यात हजारो सापांसोबत अनेक जखमी प्राणी,पक्ष्यांचे नागरिकांच्या घरून किंवा शेतातुन सुरक्षित सुटका करण्यासाठी निःस्वार्थपणे अहोरात्र प्रयत्नशील असतात.ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे त्यांना दरवर्षी उत्कृष्ट निसर्गमित्र- सर्पमित्र पुरस्कार मेडल,ट्रॉफी व प्रमाणपत्राच्या रुपात देऊन त्यांच्या निसर्गकार्याची दखल घेतली जाते.

Post a Comment

0 Comments