Advertisement

गडचिरोली:-जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींने मेडिकल कॉलेज करीता ठराव घ्यावा आमदार डॉ देवरावजी होळी यांनी शासनाकडे मागणी केली


जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मेडिकल कॉलेज करिता ठराव घ्यावा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे  जिल्हा  सरपंच संघटनेला  पत्र

दिनांक २९ मे गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात मंजूर झालेले मेडिकल कॉलेज सुपर स्पेशालिटी  हॉस्पिटलच्या नावावर रद्द करून गडचिरोली जिल्ह्यातील  नागरिकांची फसवणूक राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार ने केली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी महाविकास आघाडी  सरकारच्या या निर्णयाचा विरोध करून  गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्याच्या सोयी सुविधा करिता  अत्‍यंत आवश्‍यक असलेले मेडिकल कॉलेज प्रथमता मंजूर  करावे व त्यानंतरच जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे   अशा मागणीचा ठराव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावा व शासन स्तरावर त्याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी करणारे पत्र आमदार डॉक्टर देवरावजी होळी  यांनी जिल्हा सरपंच संघटनेला दिले.
यावेळी जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष यांचेसह पदाधिकारी व सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी यापूर्वीच शासनाकडे मागणी केली असून त्याबाबतचे निवेदन  त्यांनी शासन स्तरावर ती पाठवलेले आहे . एवढेच नाही तर जिल्ह्यातील विविध संघटनांच्या ,विविध पक्षाच्या नेत्यांना , सामाजिक कार्यकर्त्यांना भेटून त्याबाबतचे  निवेदन  पत्र देवून करीत आहेत. पत्रातून शासनस्तरावर आपणही पाठपुरावा करावा अशी विनंती सर्वांना करीत आहेत.

जिल्ह्याची सरपंच संघटना महत्त्वपूर्ण असून प्रत्येक ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामपंचायतीने याबाबत कठोर भुमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

जिल्हा सरपंच संघटनेचे पदाधिकारी यांनीही आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची भेट  याबाबतचे निवेदन दिले. आपण ग्रामपंचायत स्तरावरून राज्य सरकारला याबाबत ठराव घेऊन निवेदन द्यावे तसेच प्रत्येक गावात आवश्यकता पडल्यास या आंदोलन करावे असे आवाहन त्यांनी  सरपंच संघटनेच्या भेटीदरम्यान केले

Post a Comment

0 Comments