Advertisement

लाखनी:-इंजि. राजेश गायधनी यांना कृषी सन्मान पुरस्कार प्रदान

 
एसके जी पंधरे :-उपसंपादक ट्राईबल टाईगर 47 न्युज 

  लाखनी:-
     अशोक लेलँड कंपनी मध्ये 25 वर्षे सेवा दिल्यानंतर ऐच्छिक सेवानिवृत्ती घेऊन संपूर्णपणे झोकून शेती करणारे लाखनी येथील सेवानिवृत्त इंजिनीअर राजेश गायधनी यांना नुकताच ग्रामायन प्रतिष्ठान नागपूर तर्फे कृषी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी, निवृत्त मेजर जनरल अच्युत देव, कुरखेडा गडचिरोली येथीलआम्ही आमच्या आरोग्यासाठी या आदीवासी भागातील संघटनाचे सुप्रसिद्ध सेवाव्रती डॉ. सतीश गोगुलवार, बोर व उमरेड करांडला व्याघ्रप्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी प्रमोदकुमार पंचभाई तसेच ग्रामायन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे यांचे हस्ते नागपूर येथील सायंटिफिक सभागृहात प्रदान करण्यात आला.
   इंजि राजेश गायधनी यांनी आपल्या शेतात वेखंड ही औषधी व सुगंधीत वनस्पतींची मागील 8 वर्षांपासून लागवड करून त्याची उत्पादन करून त्यावर प्रक्रिया करून ते पश्चिम महाराष्ट्रातील अनेक औषधी व सुगंधी द्रव्य उत्पादकांना सरळ विक्री ही संपूर्ण प्रक्रिया ते स्वतः राबवितात.त्याचबरोबर सेंद्रिय व जैविकपद्धतीच्या शेतीनुसार जीवामृताचा, गांडुळखताचा वापर करून हळद,धान, मोवरी इत्यादी इतर पिकांचे सुद्धा उत्पादन ते घेत असतात.त्यांच्या या प्रयोगात्मक शेतीवर कृषी विभागाने अनेकदा शेतकऱ्यांची शिवारफेरी आयोजित केली व विविध मार्गदर्शन त्यांना देत असतात.ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच विद्यार्थी यांची क्षेत्रभेट त्यांच्या शेतावर देऊन ते मार्गदर्शन देत असतात. त्यांच्या या कृषीकार्याची दखल घेऊन ग्रामायन प्रतिष्ठान नागपूर तर्फे कृषी सन्मान पुरस्कार त्यांना विविध वर उल्लेखिलेल्या प्रमुख अतिथींचे हस्ते प्रदान करण्यात आला.त्याबद्दल त्यांचे ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे तसेच विविध प्रयोगशील शेतकऱ्यांकडून ,कृषिविभागातर्फेअभिनंदन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments