आज दिनांक २मे२०२२ रोजी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, कोडीद येथे दैनंदिन लसीकरण(RI) दरम्यान पोषण आहार सप्ताह साजरा करण्यात आला.
ह्यावेळी उपस्थित गरोदर माता ह्यांना गरोदर दरम्यान दैनंदिन जीवनातील आहार कसा असावा आहाराचे महत्व व कॅल्शिअम व फॉलीक अॅसिड गोळ्यांचे महत्व आई व येणाऱ्या गर्भासाठी कसे आहे हे गरोदर मातेला आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा व आरोग्य सेविका श्रीमती प्रमिला गिरासे ह्यांनी सांगितले.
ह्यावेळी प्रात्यक्षिक म्हणून अनेक आहारातील पदार्थ, पालेभाज्या, डाळी ठेवण्यात आले.
ह्यावेळी उपस्थित आशा सेविका श्रीमती सविता पावरा, अलका पाटील, वंदना पावरा, तारकीबाई पावरा आदि उपस्थित होते.
0 Comments