Advertisement

शिरपूर तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ : पटेल परिवाराच्या प्रयत्नांमुळे आदिवासी समाजाला आशेचा नवा किरण सापडलाय.!



         आज दिनांक १९ मे२०२२ गुरुवार  रोजी श्री.विलेपार्ले केलवणी मंडळ, मुंबई व श्री.मुकेशभाई पटेल मेडिकल फाऊंडेशन शिरपूर ह्यांच्या विद्यमानाने आयोजित ग्रा.पं.कोडीद व गुऱ्हाडपाणी अंतर्गत येणाऱ्या क्रमशः टाक्यापाणी व सामरादेवी येथील मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी लाभार्थी ह्यांना आनंद (गुजरात) येथे पाठविण्यात आले.  
         शिरपूर तालुक्यातील  सामरादेवी व टाक्यापाणी सारखी आदिवासी सातपुड्याच्या कुशीतील वस्ती असलेली पाडे अजुन ही अतीदुर्गम गावांच्या यादीत मोजले जातात. सदर  पाड्यात अजून ही बहुतेक विकास योजना पोहचण्यासाठी अडथळा निर्माण होतो. आणि हिच कारणे लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी गावकऱ्यांची साथ सोबत घेऊन विविध शासकीय योजनांची सांगड सोबत घेऊन विकासाच्या मार्गाकडे वाटचाल केली आहे. आणि त्यातील  सदर कार्यक्रम हा सर्वात महत्वाचा पैलू ठरेल यात मुळीच शंका नाही. चांगले आरोग्य ही मानवाची सर्वप्रथम आणि सर्वात महत्वाची गरज आहे. आणि याचं तत्वाला उद्देशून सदर कार्यक्रम हाती घेत गावाची विकासाकडे वाटचाल होत आहे. 
       यात मा.आ.श्री.अमरिशभाई पटेल विधानपरिषद आमदार धुळे-नंदुरबार, मा.आ.श्री.काशीरामदादा पावरा आमदार शिरपूर विधानसभा, मा.श्री.भुपेशभाई पटेल उपनगराध्यक्ष शि.व.न.पा शिरपूर., मा.श्री.चिंतनभाई पटेल उपाध्यक्ष एस. व्ही. के .एम फाऊंडेशन, मा.के.डी.पाटील सर उपजिल्हाध्यक्ष भाजपा धुळे, बापुसो अशोकजी कलाल ह्यांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वाखाली भूपेशभाई फ्रेंड सर्कल व विकास योजना आपल्या दारी अभियाना अंतर्गत शिरपूर तालुक्यातील ग्रा.पं.कोडीद व गुऱ्हाडपाणी अंतर्गत येणाऱ्या क्रमशः टाक्यापाणी व सामरादेवी परिसरातील गावपाड्याखेड्यातील लाभार्थ्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी आनंद (गुजरात) येथे पाठविण्यात आले.
    ह्यावेळी स्थानिक गावकऱ्यांनी पटेल परिवाराचे विशेष आभार मानले व अहोरात्र जमिनी स्तरावर कार्य करणारी श्री.मुकेशभाई पटेल मेडिकल फाऊंडेशन शिरपूर, श्री.भूपेशभाई पटेल फ्रेंड सर्कल टीमचे शिरपूरच्या सर्व टीमचे विशेष आभार मानले.

Post a Comment

0 Comments