Advertisement

श्री.विलेपार्ले केलवणी मंडळ, मुंबई व श्री.मुकेशभाई पटेल मेडिकल फाऊंडेशन शिरपूर ह्यांच्या विद्यमानाने आयोजित ग्रा.पं.कोडीद व गुऱ्हाडपाणी अंतर्गत येणाऱ्या क्रमशः टाक्यापाणी व सामरादेवी येथे आज भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न.!.

*༶༺𖠷◈════◈༺𖠷◈════◈༻༶*


    मा.आ.श्री.अमरिशभाई पटेल विधानपरिषद आमदार धुळे-नंदुरबार, मा.आ.श्री.काशीरामदादा पावरा आमदार शिरपूर विधानसभा, मा.श्री.भुपेशभाई पटेल उपनगराध्यक्ष शि. व. न.पा., मा.श्री.चिंतनभाई पटेल उपाध्यक्ष एस व्ही के एम फाऊंडेशन, मा.के.डी.पाटील सर उपजिल्हाध्यक्ष भाजपा,धुळे, ह्यांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वाखाली प्रमुख उपस्थितीत मा.श्री. सत्तर सिंग पावरा पंचायत समिती शिरपूर सभापती, मा.श्री. राहुलजी रंधे माजी भाजपा अध्यक्ष शिरपूर तालुका, बोराडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्री.रमण पावरा, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.प्रकाश पावरा, श्री.संजूभाऊ चौधरी, कोडीद गावाचे पोलीस पाटील श्री. भरत पावरा, डॉ.हिरा पावरा, प.स.सदस्य श्री. कांतिलाल पावरा, युवा नेते श्री.मंजीत पवार, ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिरपूर तालुक्यातील कोडीद व गुऱ्हाडपाणी ग्रामपंचायतीतील टाक्यापाणी व सामरादेवी आणि परिसरातील पाडे व ग्रामपंचायती येथील सर्व गरजू ग्रामस्थांसाठी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया धारकांना मोफत चष्मे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले. ह्याचा वापर गरजू सर्व नेत्र विकारग्रस्तांनी करवून घ्यावयाचा आहे असे आवाहन करण्यात आले.
परिसरातील व शिरपूर तालुक्यातील सर्वांनी आपल्या सभोवताली सर्वांना गरजू लाभार्थ्यांना कळवून त्यांच्या जीवनातील प्रकाश देऊन पटेल परिवाराच्या ह्या मोहिमेत सहभागी होऊया असे आवाहन मा.श्री.भूपेशभाई पटेल ह्यांनी केले.
    ह्यावेळी मा.श्री.भूपेशभाई पटेल, श्री.के.डी.पाटील सर, श्री.सत्तरसिंग पावरा, श्री.रमण पावरा ह्यांनी शिबिराचे व पारस बागेचे व अन्य अनेक योजनांचे माहिती व महत्व विस्तृत विवेचनात मांडून सांगितले 
    ह्यावेळी दोन्ही ग्रामपंचायतील पोलीस पाटील, युवक, महिला, स्थानीय लोकप्रतिनिधी, नागरिक ह्यांच्या उपस्थितीत अनेकांनी सदर शिबिराचे लाभ घेतला.
ह्यावेळी सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन व विशेष आभार श्री.मुकेशभाई पटेल मेडिकल फाऊंडेशन शिरपूर, श्री.भूपेशभाई पटेल फ्रेंड सर्कल शिरपूरच्या सर्व टीमचे विशेष आभार डॉ. हिरा पावरा ह्यांनी केले.

*༶༺𖠷◈════◈༺𖠷◈════◈༻༶*

Post a Comment

0 Comments