Advertisement

8 वर्षांपासून महाराष्ट्र दिनी उपोषण शिक्षक सुशिलकुमार पावरांची न्यायासाठी धडपड



दापोली:1 मे महाराष्ट्र दिनी अनेक ठिकाणी उपोषण व आंदोलन केली जातात.या विशेष दिनी प्रशासन आपल्या मागण्यांकडे लक्ष देईल,या अपेक्षेत अन्यायग्रस्त उपोषण व आंदोलन करीत असतात.शिक्षक सुशिलकुमार पावरा हे सुद्धा गेल्या 8 वर्षांपासून प्रत्येक महाराष्ट्र दिनी आपले उपोषण न चुकता करीत आहेत. 2014 सालापासून शिक्षक पावरा 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी उपोषण करीत आहेत. पंचायत समिती दापोली,जिल्हा परिषद रत्नागिरी,जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी ,विभागीय आयुक्त कोकण भवन,आझाद मैदान मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षक सुशीलकुमार पावरा यांनी प्रत्येक महाराष्ट्र दिनी ही उपोषण केली आहेत.तरी अद्याप त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत,म्हणून पावरा यांनी सातत्याने आपला उपोषणाचा लढा सुरूच ठेवला आहे. बोगस, भ्रष्टाचारी अधिका-यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत माझे उपोषण मी सुरूच ठेवणार आहे असा निर्धार करत जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपले 271 वे उपोषण दापोली येथे सुरूच ठेवले आहे.आर.एम.दिघे गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांनी पावरा यांनी दिलेल्या उपोषणाच्या निवेदनाची दखल घेतली आहे. गटविकास अधिकारी दापोली यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना मागण्यांबाबत कार्यवाहीसाठी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
              गर्जा महाराष्ट्र माझा अशी गर्जना करत शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी हे उपोषण सुरू केलेले आहे. दोषी,भ्रष्टाचारी,बोगस अपंग प्रमाणपत्र धारी व षडयंत्र कारी श्री. विजय दाजी बाईत तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली व बोगस डिग्री धारक , दोषी श्री.नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली या दोन्ही बोगस विस्तार अधिका-यांना सेवेतून बडतर्फ करा,31 दोषारोपीत श्री. एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा व माझी उर्वरीत 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा तसेच 28 मागण्यांच्या तात्काळ पूर्तता करा .या मागणी साठी शिक्षक पावरा यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे.

Post a Comment

0 Comments