Advertisement

पोहरा गावाला तिसऱ्या भेटीच्या वेळेस अ.भा. अंनिसचे जिल्हा टीम व जिल्हाअध्यक्ष मदन बांडेबूचे मार्गदर्शन करताना



*पोहरा येथे 15 दिवसापासून अज्ञात मानसिक विकृत व्यक्तीकडून कोणताही दहशतयुक्त अनुचित प्रकार नाही*

*अ. भा. अंनिस ,पोलीस व गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास*

*अ.भा. अंनिसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केले गावकऱ्यांना मार्गदर्शन*
लाखनी:-
   संपूर्ण भंडारा गोंदिया जिल्ह्यात  जवळपास 1 महिन्यापासून अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळेस पोहरा गावकऱ्यांमध्ये भीती दहशत माजविणारे प्रकरण आता मात्र  शांत झाले असून मागील 15 दिवसापासून अभा अंनिसच्या प्रयत्नामुळे,तसेच पोहरा गावकऱ्यांच्या सातत्यपूर्ण जागत्या पहाराने तसेच लाखनी पोलीस स्टेशनच्या कडक गस्तीने  अज्ञात मानसिक विकृत व्यक्तीची भंबेरी उडाल्याने त्याने आता आपले रात्रीच्या वेळेस मानसिक विकृत प्रकार करणे बंद केले आहे.या अज्ञात व्यक्तीच्या विकृत प्रकारात सुरवातीला महिलांची छेडखानी करणे,ते नाही जमले तर नंतर दरवाजा ठोठावणे,घरावर चालणे,टॉर्च प्रकाश चमकवणे, विचित्र पेहराव घालून रात्री अंधारात दहशत माजवणे यामुळे गावात भीती, दहशतीसोबत अंधश्रद्धा व अफवांचा सुद्धा फैलाव होत होता.केवळ पोहरा ग्रामवासी नाहीतर परिसरातील खेड्यापाड्यात सुद्धा याची दहशत पसरली. त्यातच सुरवातीला मोबाईल आणि समाजमाध्यमानी अतिरंजित वार्तांकन केल्याने व फेक व्हिडिओ दाखविल्याने परिसरात अंधश्रद्धा ,भीती,गैरसमजुती वाढीस लागल्या होत्या.या सर्व कारणांमुळे गावकऱ्यांची भीती दहशत व अंधश्रद्धा दूर करण्याकरिता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडाराने तिनदा पोहरा गावाला भेट देऊन सातत्यपूर्ण प्रयत्न केले. तिसऱ्या भेटीवेळी अभाअंनिसचे जिल्हा अध्यक्ष मदन बांडेबूचे, जिल्हा सचिव मूलचंद कुकडे ,जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.अशोक गायधने तसेच लाखनी अ.भा. अंनिसचे तालुका अध्यक्ष अशोक वैद्य, तालुका सचिव नामदेव कान्हेकर,सहसचिव पंकज भिवगडे, तालुका कार्याध्यक्ष योगेश वंजारी,सहसचिव दिलीप भैसारे यांनी  पोहरा गावात मार्गदर्शन केले.तरुणासोबत गस्त केली,अफवा पसरवण्याऱ्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे व इतर समाजमाध्यमाना कडक तंबी दिली.अफवा खरे मानणाऱ्या लोकांना 'भूत सिद्ध करा व 25 लाखाचे समितीचे बक्षीस जिकून दाखवा' असे आव्हान अ भा अंनिसतर्फे देण्यात आले. अ.भा. अंनिस ,सरपंच तसेच लाखनी पोलीस स्टेशन मार्फत समाजमाध्यमाना इशारा देत उदबोधन केले.त्यानंतर समाजमाध्यमानी मात्र सकारात्मक वार्तांकन केले. त्याचबरोबर अ.भा. अंनिस समितीच्या जिल्हा व तालुका शिष्टमंडळाने  लाखनी पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी यांचेशी चर्चा करून सकारात्मक आढावा घेतला.तसेच पोहरा सरपंच  रामलाल पाटणकर,पोलीस पाटील भैय्यालाल मते यांचेशी वेळोवेळी संपर्क साधून  दिशानिर्देश दिल्याने पोहरा ग्रामवासीयांमध्ये एकप्रकारे आत्मविश्वास तयार झाला.  तसेच अज्ञात मानसिक विकृत व्यक्तीला अ.भा. अंनिसच्या माध्यमातून  'तो विकृत व्यक्ती जर पकडला गेला तर नवीन महाराष्ट्र जादूटोणा व नरबळी कायदा- 2013  अंतर्गत कडक अजामीनपात्र शिक्षा कशी होऊ शकते' याचा संदेश जागृती कार्यक्रमातून ,बैठकीतून पोहचविण्यात आला.या सर्व घडामोडीमुळे अज्ञात मानसिक विकृत व्यक्तीला आता आपले काही खरे नाही हे समजून आपला विकृत दहशती कृत्याचा गाशा त्याने अखेर  गुंडाळला. अभा अंनिसने पोहरा गावातील  तरुणांनी 15 दिवस मध्यरात्री किंवा उत्तर रात्रीपर्यंत स्वयंसेवी गस्त केली त्या गस्ती पथकातील तरुणाचे सुद्धा शाबासकी देऊन कौतुक केले.यामध्ये दत्ता हटनागर,मुकेश मते,करण गायधने, तेजस कमाने, दीपक धरमसारे,अभिषेक गोटेफोडे, लोकेश मते,दर्वेश दिघोरे,सचिन कडूकार, गौरव अंबादे, निरंजन सार्वे,दौलत सार्वे,करण बोरकर,अक्षय गायधने,आदित्य भगत,किशोर शिवणकर,रवी बोरकर,राहील शेख इत्यादी तरुणांनी व नागरिकांनी स्वयंसेवी  गस्त लावून पोहरा ग्रामवासीयांची दहशत कमी केली व अज्ञात व्यक्तीला अंधारात पकडण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल अभा अंनिस समितीने त्यांचे विशेष कौतुक केले.

Post a Comment

0 Comments