Advertisement

दापोली:-नंदलाल शिंदेकडून विधवा महिलेचा मानसिक छळ विधवा महिलेने मारली मदतीची हाक

दापोली:वादग्रस्त नंदलाल कचरू शिंदे हे आपल्याला सुडबूद्धीने मानसिक त्रास देत आहेत,मला मदत करा,नंदलाल शिंदे यांच्या त्रासापासून वाचवा अशी हाक एका विधवा महिला कर्मचारी यांनी संघटनेस दिली आहे.  
आपण नंदलाल शिंदे विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे तक्रार करणार आहे,अशी माहितीही त्या विधवा कर्मचारी महिलेने फोनवरून दिली आहे.त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ माजली आहे.नेहमीच वादग्रस्त असणारे व बोगस डिग्रीधारक नंदलाल कचरू शिंदे यांना मंडणगडचा प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदभार का देण्यात आला? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.कारण नंदलाल कचरू शिंदे हे नेहमीच आपल्या पदाचा दुरूपयोग करत महिलांचा व शिक्षकांचा छळ करत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे होतात.नंदलाल कचरू शिंदे यांच्यावर एका शिक्षकावर चाकू हल्ला केल्याचा फौजदारी गुन्हा दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.त्याचबरोबर माहिती अधिकार अर्ज टाकणा-यांनाही जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारी व फौजदारी गुन्हा दाखल आहेत. याव्यतिरिक्त अनेक शिक्षक संघटना,शिक्षक, केन्द्रप्रमुख ,शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या सुद्धा नंदलाल शिंदे बद्दल तक्रारी वरिष्ठांकडे दाखल आहेत. 
                   नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची आग्रा विद्यापिठाची डिग्री शिक्षण विस्तार अधिकारी पदाधिकारी अवैद्य ठरविण्यात आली आहे. तसा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी रत्नागिरी किरण लोहार यांनी दिलेला आहे. तसेच नंदलाल शिंदे हे महिला कर्मचा-यांचा छळ करणे,अनेक शिक्षकांना त्रास देणे व बोगस डिग्रीत दोषी ठरले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
                  नंदलाल कचरू शिंदे यांना सेवेतून बडतर्फ करा या मागणीसाठी शिक्षक सुशीलकुमार पावरा हे सातत्याने उपोषण करत आहेत. नंदलाल कचरू शिंदे यांनी दिनांक 7/5/2015 रोजी माहिती अधिकार अर्ज कोर्टटिकीटसह फाडल्याची तक्रार दाखल आहे.अशा वादग्रस्त शिक्षण विस्तार अधिका-यांवर काही अंशी कारवाई होत असली तरी शिंदेंना कारवाई पासून वाचविण्यासाठी काही वरिष्ठ अधिकारी व राजकीय पदाधिकारी यांची धडपड सुरू असते.पुन्हा एका विधवा महिलेने नंदलाल शिंदे हे माझा मानसिक छळ करत असल्याची माहिती एका संघटनेला फोनवरून दिल्यामुळे जिल्हा परिषद रत्नागिरीत खळबळ माजली आहे.नंदलाल शिंदे विरोधात एवढ्या तक्रारी वाढूनसुद्धा,एकदा सेवेतून निलंबित करण्यात आले तरी हा शिक्षण विस्तार अधिकारी कनिष्ठ कर्मचा-यांचा सारखा सारखा छळ का करतो? हा सुधरणार नाही का? असा सवाल शिक्षक उपस्थित करत आहेत.

Post a Comment

0 Comments