Advertisement

आज दि.२५ एप्रिल २०२२ रोजी कोडीद जिल्हा परिषद केंद्र शाळा व उपकेंद्र, कोडीद अंतर्गत येणाऱ्या सर्व अंगवाडी व कार्यक्षेत्रातील शाळेत जंतनाशक मोहीम यशस्वी राबविण्यात आली.


    ह्या दिनानिमित्त शुभारंभ प्रसंगी शिरपूर पंचायत समिती सभापती श्री.सत्तरसिंगदादा पावरा, कोडीद गावाचे युवा पोलीस पाटील श्री.भरत पावरा, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.प्रकाशदादा पावरा, पंचायत समिती सदस्य श्री.कांतिलाल पावरा, उपसरपंच श्रीे.गौतम सोनवणे, दारख्या पावरा, संभु पावरा ह्यांची उपस्थिती लाभली.
ह्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.तापिराम पावरा सर व संपूर्ण स्टाफ उपस्थित होते.
ह्यावेळी आरोग्य सेविका श्रीमती प्रमिला गिरासे, गटप्रवर्तक ज्योती पावरा, आशा सेविका, आरोग्य टीम, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.
ह्यावेळी जंतनाशक गोळीचे महत्व व शारीरिक फायदे उपकेंद्र, कोडीदचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments