मुरबाड:डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त बिरसा फायटर्सचे कोकण विभागीय अध्यक्ष तथा आदिवासी नेते राजाभाऊ सरनोबत यांच्या संकल्पनेतून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना देण्यात आली. भारतरत्न , महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण भारतभर जल्लोषात साजरी होत
असताना मुरबाड शहरातील मध्यवर्ती भागात असणारे नगरपंचायत कार्यालयासमोर बिरसा फायटर्सचे राजाभाऊ सरनोबत यांनी संविधानाच्या प्रास्तविकाच्या प्रतिमेचे होर्डींग पुजनासाठी उभारले होते त्याचे उद्घाटन व पुजन मुरबाड नगरपंचायतचे नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे व मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. मुरबाड नगरपंचायत कार्यालयासमोर कायमस्वरुपी संविधान प्रास्तविकाच्या प्रतिमेच्या पुजनासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाईल
0 Comments