Advertisement

चंद्रपूर गोंडवाना साम्राज्यातील चांदागढ येथील प्रस्ताव पत्रे संबंधित विभागांना बिरसा फायटर्स यांनी पाडण्यात आले


प्रति,          
   मा. मंत्री, 
गृह, महाराष्ट्र राज्य, 
मुंबई.      
विषय : गोंडवाना साम्राज्यातील चांदागढ (चंद्रपूर) येथील गोंडराजे बल्लारशाह आत्राम यांच्या गौरवांकित ईतिहासाची जोपासणा करण्याकरीता, त्यांची प्रतिमा (मुर्ती) चंद्रपूर येथील मुख्य प्रवेशद्वार समोर लावणेबाबत. 
   
 मा. महोदय/महोदया,           
 जय सेवा - सेवा जोहार - जय गोंडवाना !      
 वरिल विषयाच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, भारत (India) देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी देशाचा मध्यभाग हा गोंडवाना क्षेत्र म्हणून ओळखला जात असे. याचे मुख्य कारण तेथे विविध गोंडराजांचे साम्राज्य होते. त्या साम्राज्यात अनेक गोंडराजांची 258 रियासत, 52 गढ, 57 परगणा अस्तित्वात होते व आहे. साम्राज्य स्थापन करण्यामागे गोंडराजे संग्रामशाह मडावी (सन 1482-1532) यांचा मोलाचा योगदान होता.  
 गोंडवाना साम्राज्यात विविध गोंडराजांनी 1400 वर्षे सुसमृध्दपणे शासन केले, गोंड क्रांतीविरांनी, गोंड विरांगणांनी आपआपले योगदान गोंडवाना साम्राज्य व देशासाठी दिले. परंतु, स्वातंत्र्याच्या 75 वा अमृत महोत्सव सुरु असून देखील त्यांचा ईतिहास व योगदान जनतेपासून, तसेच गोंड समुदायांपासून का लपविण्यात येत आहे ?    
त्याचप्रकारे, चांदागढ (आताचे चंद्रपूर) येथील गोंडराजे सुरजा ऊर्फ सेरशाह आत्राम यांच्या निधनानंतर इ.स. 13 व्या शतकात त्यांचा मुलगा गोंडराजे बल्लारशाह आत्राम (सन 1282-1303) यांनी आपल्या कार्यकाळात चंद्रपूर सह परिसरातील आताचे विदर्भ विभागात ठिकठिकाणी किल्ले, तलावे बांधून सुसमृध्दपणे आपले योगदान दिले. त्यांनी चंद्रपूर येथे किल्ल्याची निर्मीती करुन, तेथे आठ प्रवेश द्वार बसविले. ते जटपुरा गेट, बागड खिडकी, अंकलेश्वर गेट, हनुमान खिडकी, पठानपुरा गेट, विठोबा खिडकी, बिनबा गेट व चोर खिडकी आहे. ते सगळे प्रवेश द्वार गोंडराणी हिराई व झारपत नदिचे संगमावर जिर्ण तसेच अजिर्ण अवस्थेत स्थित असून, त्यांची समाधी देखील अस्थित्वात आहे. तसेच, गोंडराणी राजमाता हिराई आत्राम (सन 1668 ते 1728) यांनी सुध्दा आपला संपुर्ण जीवन चांदागढच्या विकासकार्याला दिला. म्हणून त्यांना चांदागढ नगरीचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाते.           
       
 मा. महोदय/महोदया, प्रकरणी दखल घेवुन, गोंडवाना साम्राज्यातील स्थानिय ईतिहासाचे रक्षण व्हावे. करीता जल-जंगल-जमीन व गोंडी संस्कृतीचे रक्षण करणारे आम्हा गोंड समुदायाला न्याय देण्यात यावे. जेणेकरुन, आमची आताची व येणारी युवा पिढींना गोंडवाना साम्राज्याचा ईतिहासाची जाणीव होण्यास मदत मिळेल. गोंड समुदायाची भावना लक्षात घेता, गोंडराजे बल्लारशाह आत्राम यांची प्रतिमा (मुर्ती) चंद्रपूर येथील गोंडराजेंनी बांधलेल्या मुख्य प्रवेशद्वार समोर लावणेबाबत, गोंड समुदायांसह, संघटनेनी विनंतीसह मागणी केलेली आहे.
        
                (प्रशांत उदारामजी पंधरे)
     युवा उपाध्यक्ष, बि.फा.संघटना (गोंडवाना-विदर्भ शाखा),
                                                         नागपूर जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रीय विश्वगामी ह्युमन राईट्स संघ (भारत), 
                                         अध्यक्ष, जय गोंडवाना बहु. व क्रिडा मंडळ, नागपूर (महा. राज्य)
प्रत : मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मुंबई.      
मा. पालकमंत्री, चंद्रपूर   
मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर  
मा. आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर

Post a Comment

0 Comments