Advertisement

महाराष्ट्रातील विद्यापिठामध्ये संशोधन अभ्यासन केंद्र प्रमुख आदिवासी समुहातील घेण्यात यावे अशी मागणी आदिवासी विकास मंत्री महा के सी पाडवी साहेब यांनी पत्राद्वारे सरकारांना केली


अध्यासन केंद्रास जयपालसिंग मुंडा,बिरसा मुंडा राघोजी भांगरे, या आदिवासी महानायकांचे नावे देण्यात यावे:- आदि.विकास मंत्री
मुंबई :-(६एप्रिल) महाराष्ट्रातील विविध विद्यापिठामध्ये वेगवेगळ्या विषयावर अभ्यासन केंद्र (study centers)चालवून त्या विषयाचे अनुसंघाने संशोधनाचे समाज पयोगी कार्यक्रम राबविले जातात.
आदिवासी समुहाच्या बाबतीत सुध्दा विद्यापिठ प्रशासन अनभिज्ञ राहू नये म्हणुन प्रशासन कुलगुरू व राज्यपालाचे लक्ष वेधण्यासाठी
प्रसिध्द कवियीञी बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ येथे अध्यासन केंद्र सुरु करावे.व त्या अभ्यासन केंद्रास तत्कालिन भारतीय संविधान समिती उप- समिती सदस्य जयपालसिंग मुंडा, शहिद बिरसा मुंडा,राघोजी भांगरे, किंवा त्या त्या परिसरातील आदि वासी महानायकाचे नाव देण्यात यावे.व त्या अभ्यासन केंदाच्या प्रमुखाची नेमनुक आदिवासी समुहातून करण्यात यावी के सी पाडवी साहेब यांनी अशा आशया चे पञातून त्यांनी सरकारचे प्रति संवेदना प्रकट करित कुलगुरू, कवियीञी बहीनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र  विद्यापिठ जवगांव  जि जळगां‌ यांचेकडे मागणी केली आहे.व अशा प्रकारच्या मागणीचे 
सर्व आदिवासी संघटणांनी ईतरही  विद्यापिठात असे उपक्रम राबवून 
आप आपआपल्या सामाजिक संघटणांनी लेटर पँडवर राज्यपाल तसे त्या त्या विभागातील संबंधीत विद्यापिठ प्रशासन व कुलगुरूंना  पञक देत मागणी लक्षात आनुन देण्यात यावे असे सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स  विदर्भप्रात तथा सहसंघटक रा वि पञकार संघाचे वतीने प्रसार माध्यम व प्रतिनिधीसी बोलतांनी प्रतिक्रिया दिली आहे.तसे जर भविष्यात झाले तर आपले शहिद वीरांचा इतिहास पुढे आणण्यास निश्चित मदत होईल व या कामी शैक्षणिक क्षेञातील मान्यवर या कामी पुढे यावे असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments