Advertisement

लाखनी:गृहअर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना तर्फे मुरमाडी/ तुपकर येथे 'जागतिक वसुंधरा दिन' साजरा

लाखनी:-
      निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सयूंक्त विद्यमाने आयोजित जागतिक वसुंधरा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
    या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बी बी ढवळे, गृहअर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. अर्चना निखाडे व राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा विश्वास खोब्रागडे यांनी जागतिक वसुंधरा दिनाची पार्श्वभूमी व महत्व विद्यार्थ्यांना समजावून दिले.सर्वांचे स्वागत वृक्षरोपे देऊन करण्यात आल्यानंतर महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यानंतर प्रश्नमंजूषा स्पर्धा गृहअर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचे सयूंक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली .राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा विश्वास खोब्रागडे यांनी स्पर्धेचे संचालन केले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक कोमल गिल्लोरकर हिला तर द्वितीय क्रमांक पूजा पंधरे प्रोत्साहनपर क्रमांक श्वेता खांडेकर ,रीना बिसनकर यांना प्राप्त झाला.स्पर्धा आटोपल्यावर प्रभारी प्राचार्य बी बी ढवळे यांनी स्पर्धा विजेत्यांना वृक्षरोपे पारितोषिक म्हणून दान केले तसेच सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना वसुंधरेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ अर्चना निखाडे तर संचालन प्रा. विशाल गजभिये व आभार प्रदर्शन महिंद्र फुलझेले यांनी केले. 
 कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्रा.डॉ श्रीकांत भुसारी, प्रा डॉ राहुल चुटे,प्रा.स्नेहा शामकुवर,प्रा.डॉ. भूमेश्वरी वाघाये,गीतेश्वरी तरोणे, खेमराज वाघाये, श्रीकांत धुर्वे, अजय मेश्राम,अमर जांभुळकर,शोएब शेख,किशोरी नानोरे, तेजेंद्र सदावर्ती,देवेंद्र मेंढे यांनी अथक परिश्रम केले

Post a Comment

0 Comments