नुकतेच *औरंगाबाद येथील एमजीएम विद्यापीठाच्या* वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या *'बाई माणूस'* या अभिनव पोर्टलच्या उद्घाटनास उपस्थित *मा. खासदार सुप्रिया सुळे, महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त प्रतापराव बोराडे, एमजीएम वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, एमजीएम स्कुलच्या संचालक डॉ. अपर्णा कक्कड,अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या सोनाली कुलकर्णी, डॉ. रेखा शेळके,ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार* आदी
मान्यवराच्या उपस्थितीत *आदिवासी युवा कवी संतोष पावरा, नंदुरबार* यांना प्रशस्तिपत्र, पुषपगुच्छ व रोख स्वरूपात मानधन देऊन विशेष सन्मानाने गौरविण्यात आले होते.
यावेळी 'बाई माणूस'च्या कार्यालयाचेही उद्घाटन झाले विशेष म्हणजे कार्यक्रमाची सुरुवातच युवा कवी संतोष पावरा यांच्या *आदिवासी बोली भाषेतील कवितेने सुरुवात झाली.* त्या नंतर औपचारिक रित्या ढोल वाजवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी 'बाईमाणूस'च्या पत्रकार शमिभा पाटील (फैजपूर), किरण गीते (औरंगाबाद), रेणुका थोरात (अहमदनगर), निमा पटले (नंदूरबार), पूनम चौरे (डहाणू),
भाग्यश्री लेखामी (गडचिरोली), रक्षा फुलझेले (चंद्रपूर), सुकेशनी नाईकवाडे (बीड) आणि दुर्गा गुडीलू (मुंबई) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात मोखाडा येथील आदिवासी नृत्य, लावणी व संतोष पावरा यांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले.
0 Comments