Advertisement

बॅंक ऑफ बडोदा तळोदा येथील मॅनेजर वर कारवाई करण्यात यावे असे निवेदन एकलव्य आदिवासी युवा संघटना तर्फे देण्यात आले




 प्रती,


मा तहसीलदार सो


ता. तळोदा जि नंदुरबार,


विषय:बँक ऑफ बडोदा तळोदा मॅनेजर वर कारवाई करण्याबाबत


उपरोक्त विषयान्वये विनंतीपूर्वक आम्ही एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने निवेदन


सादर करण्यात येत आहे की, तळोदा तालुक्यातील बँक ऑफ बडोदा शाखा तळोदा येथील बँक मॅनेजर मनमानी कारभार करून गरीब आदिवासी लोकांना 60 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसांना हयात दाखल्यासाठी कागदपत्रे असून देखील जाणून बुजून कागदपत्र घेऊन येण्याचे सक्ती करून त्रास देण्याचे काम चालू आहे. बँक मॅनेजर हे आदिवासी समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याची बाब समोर आली आहे.


या बँकेत आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात ग्राहक असून देखील जातीभेद करित असल्याचे



चित्र निर्माण झाले आहे तसेच ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होऊ नयेत म्हणून मिनिबॅकची निर्मिती करण्यात आली मात्र तळोदा तालुक्यातील रहिवाशी असलेल्या लोकांना रानी बँकेची आयडी न देता. गुजरात राज्याच्या एका व्यक्तीला मिनी बँक चालवण्यासाठी परवानगी दिली आहे. ज्याना या भागातील लोकांबद्दल कुठल्याही प्रकारचे घेणेदेणे नाही त्यामुळे त्याचे देखील मनमानी कारभार सुरु आहे. व आणि आदिवासी बेरोजगार तरुण मिनिबॅक आयडीची मागणी करत असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन मीनी बँकेची परवानगी देत नसल्याचे दिसून येत यावरून सुस्पष्ट होते की कुठेतरी बॅक मॅनेजर जातिभेद करतांना दिसत आहे

त्यामुळे बँक ऑफ बडोदा ची पूर्णता चौकशी करून दोषी आढळल्या वर तेथील कर्मचाऱ्यांवर व बँक मॅनेजर यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. हि नम्र विनंती,

ॲड गणपत पाडवी

महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता एकलव्य आदिवासी युवा संघ

Post a Comment

0 Comments