Advertisement

कुडावळे आदिवासीवाडीत पाणीपुरवठा योजना सुरू करा गटविकास अधिकारी व उपअभियंता पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती दापोली यांना बिरसा फायटर्सची मागणी

दापोली: कुडावळे आदिवासीवाडीत सौर ऊर्जा पंपासह पाणीपुरवठा योजना सुरू करा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने आर.एम.दिघे गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली व आनंदे उपअभियंता पाणीपुरवठा विभाग कार्यालय दापोली यांच्या कडे एका निवेद्नाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी बिरसा फायटर्सचेराष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, महाराष्ट्र राज्य महिला तथा जिल्हाध्यक्षा रत्नागिरी प्रतिनिधी चंद्रभागा पवार, रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप पवार आदि आदिवासी बांधव उपस्थित होते. 

          निवेदनात म्हटले आहे की, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेण जिल्हा रायगड यांना सरपंच ग्रामपंचायत कुडावळे यांनी दिनांक 01/11/2021 रोजी पाणी पुरवठा योजना सुरू करणेबाबत विनंती अर्ज केला होता.तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली जिल्हा रत्नागिरी यांना सरपंच ग्रामपंचायत कुडावळे यांनी दिनांक 12/10/2021 रोजी पाणीपुरवठा योजना सुरू करणेबाबत विनंती अर्ज केला होता.कुडावळे आदिवासीत पाण्याची अत्यंत गरज असून ठक्कर बापा पाणीपुरवठा योजनातून पाईपलाईन व सौर उर्जा पंपाच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात यावा,अशी मागणी ग्रामपंचायत कुडावळे मार्फत करण्यात आली होती. परंतु अद्यापही कुडावळे आदिवासी येथे पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली नाही. 
        महोदय, कुडावळे आदिवासीवाडीत सध्या पाण्यासाठी तेथील लोकांना वणवण भटकावे लागत आहे. पाण्याची सोय नसल्यामुळे येथील लोकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कुडावळे आदिवासीवाडी हे दुर्गम भागातील ठिकाण असून तेथे फक्त एक ढोरा आहे, ज्यात पावसाचे पाणी साचून पावसाळ्यातच पाणी असते.ढोरा आटल्यावर उन्हाळ्यात व हिवाळ्यात पाणी मिळत नाही.परिणामी आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.कुडावळे आदिवासी वाडीतील पाण्याची समस्या लक्षात घेऊन कुडावळे आदिवासीवाडी येथे सौर ऊर्जा पंपासह पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments