Advertisement

दापोली: उपोषण हा माझा जिवनाच्या संघर्ष: शिक्षक सुशिलकुमार पावरा

दापोली :उपोषण करणे हा माझ्या जीवनाचा संघर्षाचा भाग आहे. 2015 साली जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी समोर माझे पहिले उपोषण झाले.सलग तीन दिवस उपोषण केल्यामुळे माझी तब्येत बिघडली व मला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्या उपोषणात मला 14 सलाईन लावण्यात आले. प्रशासन हे केवळे निगरगट्ट असते,उपोषणकर्त्याच्या जीवाचीही पर्वा करत नाही,याचा अनुभव अनेकदा आला.15 ऑगस्टला आत्मदहनाचा प्रयत्न झाला,तरी प्रशासनाला फरक पडत नाही. उपोषण करणे हे येड्यागाबाड्याचे काम नसते.उपोषणात आपल्या स्वतःच्या जीवाची जबाबदारी स्वतःवर असते.कारण संबंधित प्रशासन हे उपोषणकर्त्याला उपोषणासारख्या टोकाची भूमिका घेऊ नये,उपोषण कराल तर सर्वस्वी जबाबदार तुमची राहील, यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे सरळ पत्र देऊन आपले अंग काढून घेते.तेव्हा स्वतःच्या हिमतीवर व जबाबदारीवरच उपोषणाचा लढा हा लढावा लागतो.
              
      जिल्हा परिषद रत्नागिरी,जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी, विभागीय आयुक्त कोकण भवन,राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ,आझाद मैदान मुंबई, मंत्रालय मुंबई अशा विविध ठिकाणी मला नाईलाजाने उपोषण करावे लागले.त्यामुळे अजस्त्र सरकारी यंत्रणेला मी जवळून पाहिले आहे. सरकारी यंत्रणा ही एकमेकांशी मिळालेली असते,याचा सुद्धा प्रत्यय आला.न्यायालयीन मार्ग खर्चिक व विलंबाचा असतो. म्हणून सामान्य माणसाला उपोषणामुळे प्रशासनाला कुठेतरी जाग येऊन लवकर न्याय मिळेल ही अपेक्षा असते. किंबहुना उपोषण करणे हाच सामान्य माणसाला एकमेव मार्ग उरतो.सत्याचा शेवटी विजय होतो या आशेवर नाईलाजाने उपोषण करावे लागते, अशी प्रतिक्रिया उपोषण कर्ते शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे. 
             जोपर्यंत मला न्याय मिळत नाही व दोषी, बोगस, भ्रष्टाचारी अधिका-यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही, असा निर्धार करत जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपले 256 वे उपोषण दापोलीत सुरूच ठेवले आहे. उपोषणाचे निवेदन दापोलीचे तहसीलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांना दिले आहे.दोषी व बोगस शिक्षण विस्तार अधिकारी नंदलाल कचरू शिंदे व विजय दाजी बाईत ह्या दोन्ही शिक्षण विस्तार अधिका-यांना व 31 दोषारोपीत एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना सेवेतून बडतर्फ करा,माझी 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा,अशा एकूण 28 मागण्यांसाठी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी दापोली येथे उपोषण सुरूच ठेवले आहे.

Post a Comment

0 Comments