Advertisement

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या भागात तिनसमाळ व शेलदा येथे मूलभूत समस्या सोडविण्यासाठी गावकऱ्यांनी उपोषणाला बसले



नंदुरबार:-नंदुरबार जिल्हयाच्या सातपुडा पर्वताच्या दुसऱ्या रांगेत आणि अतिदुर्गम भागात बसलेले तिनसमाळ गावात कोणतीही मूलभूत सुविधा नाही, पिण्याचा पाण्याची सोय नाही, रस्ता कच्चा आणि कागदावर पूर्ण अश्या करणांमुळे दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी तिनसमाळ ग्रामस्थ व शेलदा ग्रामस्थ मिळून तिनसमाळ येथे आमरण उपोषणास बसले आहे. जो पर्यंत शासन समस्या सोडवत नाही तोपर्यंत आमरण उपोषण केले जाईल असा इशारा स्थानिक ग्रामस्थ तानाजी पावरा यांनी निवेदनात म्हंटले आहे.

 तिनसमाळ रस्त्याच्या भ्रष्टाचारामुळे रस्ता आजही पूर्ण झाला ना


ही व निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाला फसविले असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तरी कृषी, फॉरेस्ट, तलाठी, ग्रामसेवक, ,तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी जो पर्यंत येऊन समस्या सोडवत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यात कोणतीही जीवितहानी झाल्यास सर्वस्व शासन जबाबदार राहील. असा इशारा देत उपोषणास बसले आहे.



Post a Comment

0 Comments