Advertisement

दिंडोरी:- वरखेडा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला अभिवादन


दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी महामानवाच्या पुतळ्याला उपस्थित महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज,राघोजी भांगरे,क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, माता रमाई व अण्णा भाऊ साठे यांच्याही प्रतिमांना उपस्थित महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महिलांना प्राधान्य दिल्याने बाबासाहेब आंबेडकर यांच्या महीला मुक्ती अन् समतेच्या तत्वाची आठवण झाली,जयंती उत्सव समितीने सुरू केलेल्या या नवीन पध्दती साठी सर्व स्थरातुन कौतुक करण्यात येत आहे. यावेळी सानिका गांगुर्डे, समृद्धी गांगुर्डे, दिशा ऊफाडे व स्वरा ऊफाडे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरीत्रावर मनोगत व्यक्त केले.तसेच माजी उपसरपंच राजेंद्र ऊफाडे यांनी बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन करून ग्रामस्थांना व भारतवासीयांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कादवा कारखान्याचे संचालक बापुराव पडोळ, माजी सरपंच जयश्री कडाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य माया ऊफाडे,माजी ग्रामपंचायत सदस्य सविता गांगुर्डे, तंटामुक्ती अध्यक्ष माणिकराव ऊफाडे,वरखेडा सोसायटीचे संचालक दशरथ ऊफाडे, संचालक संजय ऊफाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य भिकाजी भगरे, चिंधु लिलके, गांगुर्डे गुरूजी आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्सव समितीचे मार्गदर्शक व गावचे पोलीस पाटील कैलास बलसाने यांनी केले व आभार निलेश गांगुर्डे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments