Advertisement

दापोली:गुरूजींच्या पगाराचे राजकारण

दापोली: शिक्षकांच्या पगार बिलावर वेळेत सह्या होत नव्हत्या,म्हणून एका शिक्षक संघटना पदाधिका-यांनी दापोलीचे आमदार योगेश कदम यांची भेट घेतली.आमदार योगेश कदम यांनी संबंधित अधिका-याला फोन करून बिलावर सह्या करण्यास सांगितले व 11 एप्रिल रोजी संध्याकाळी पावणे सात वाजता सही झाल्याचे आमदार योगेश कदम यांनी शिक्षक संघटना पदाधिकारी यांना कळविले .म्हणून काही शिक्षक नेत्यांनी आमच्यामुळेच शिक्षकांच्या पगाराचे काम झाल्याचे मेसेज सोशल मिडीयावर टाकले.पगाराचे काम झाल्याचे ऐकून क्षणाचाही विलंब न करता शिक्षकांनी नेत्यांचे आभारही मानले.परंतु नेत्यांचे मेसेज पडून एक आठवडा संपला तरी पगार जमा झाला नाही,म्हणून शिक्षक नेत्यांच्या कार्यप्रणालीवरच शंका उपस्थित केली जात आहे व शिक्षकांच्या पगारावरूनही राजकारण सुरू आहे का?असा प्रश्न शिक्षक उपस्थित करत आहेत. 
              दरम्यान एका शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आमदार योगेश कदम यांना भेटल्याचे वृत्त कळताच दुस-या राजकीय गटात नाराजीचा सूर दिसून आला.आमदारांनी सांगितलेल्या दिवशी पगार होऊ नयेत,म्हणून विरोधी राजकीय गटाने हात घातला की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.शिक्षकांचा पगार वेळेवर जमा होत नसल्याचे खापर प्रशासनावर फोडले जात असले तरी पगाराच्या कामात राजकारण घुसले की पगारास विलंब होतो,याचा प्रत्यय शिक्षकांना येताना दिसत आहे.गटातटाच्या राजकीय संघर्षात शिक्षकांचे मरण होत आहेत .फेब्रुवारी, मार्च महिन्याचा पगार अद्यापही जमा झाला नसल्याने अनेक शिक्षक आर्थिक संकटात सापडले आहेत.
               जिल्हा कोषागारात निधी शिल्लक नसल्यामुळे व पगार बीले चुकल्यामुळे पगार जमा होण्यास उशीर होत आहे,नवीन पगाराची बीले तयार करून फाईल पुढे सरकवली आहे,असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.मात्र शिक्षकांच्या पगारात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप, शिक्षक नेत्यांचा श्रेयवाद,राजकीय संघर्ष यामुळे गुरूजींचा पगार जमा होणे हे सुद्धा राजकीय नेत्यांच्या हातात आहे की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Post a Comment

0 Comments