Advertisement

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी व जिल्हा भंडारा तर्फे गावकऱ्यां सोबत सभा घेऊन सुसंवाद केला

*पोहरा प्रकरणाची अ.भा. अंनिस ने केली संपूर्ण शहानिशा*. 
 
*आढळले मानसिक विकृत अज्ञात व्यक्तीचे हिडीस कृत्य*

  *सरपंच व पोलीस पाटील तसेच गावकऱ्यांसोबत सभा घेऊन घातला सुसंवाद*

*अंनिसने तरुणांसोबत अंधारात गस्त करून दुर केली अंधश्रद्धा व भीती* 


  लाखनी:अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा तर्फे पोहरा येथे मागील 20-25 दिवसापासून विकृत मानसिक व्यक्तीकडून असलेल्या रात्रीच्या विविध मार्गाने केलेल्या दहशत प्रकाराची ,अनामिक भीती प्रकरणाची सखोल शहानिशा पोहरा ग्रामपंचायत कार्यालयात बैठक लावून केली .अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती भंडारा चे जिल्हा कार्याध्यक्ष व लाखनी तालुका संघटक प्रा.अशोक गायधने,तालुकाअध्यक्ष अशोक वैद्य, तालुका कार्याध्यक्ष दिलीप भैसारे, सहसचिव पंकज भिवगडे व पदाधिकारी योगेश वंजारी,सदस्य दर्वेश दिघोरे,कनेरीचे सामाजिक कार्यकर्ते नरहरी नागलवाडे यांचे समवेत पोहरा ग्रामपंचायतचे सरपंच रामलाल पाटणकर, पोलीस पाटील भैय्यालाल,ग्रामवासी मुकेश मते, दत्ता हटनागर,प्रत्यक्ष घटनादर्शी प्रतीक गायधने,दौलत सार्वे, तेजस कमाने,करण बोरकर आदी तरुणांसोबत संवाद 
10 एप्रिलला साधला. यावेळी सांगोपांग व विस्तृत चर्चेनंतर व घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंनिस समितीने निष्कर्ष काढला की पोहरा गावात मागील 20 दिवसापासून घडत असलेल्या ह्या घटना भूत -भानामतीच्या किंवा अंधश्रद्धा प्रकाराच्या नसून विकृत मानसिक अवस्थेतील अज्ञात व्यक्ती हे हिडीस कृत्य करीत आहे.सुरवातीला त्याने महिलांची छेडखानी करणे असे प्रकार केले पण गावकऱ्यांची रात्रीला गस्त वाढल्याने त्याने आता उत्तररात्री वेगळ्या प्रकारे भीती व दहशत निर्माण करणे सुरू केले आहे. त्याला लवकरात लवकर पोलिसांनी पकडून महाराष्ट्र जादूटोणा व नरबळी कायदा-2013 अंतर्गत गुन्हा नोंदवून शिक्षा द्यावी. त्याचबरोबर गावकऱ्यांनी सुद्धा भीती न बाळगता , कोणत्याही अफवा व अंधश्रध्दाला बळी न पडता आपले दैनंदिन कार्य ,व्यवहार सुरू ठेवावे असे आवाहन अभा अंनिस जिल्हा भंडारा व लाखनी तालुका शाखेने केले आहे. अभा अंनिसने दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळेस तरुणांना धरून गस्ती पथकासोबत रात्री 10 ते 12 या वेळेत पोहरा गावात व खदान परिसरात गस्त सुद्धा केली. त्यावेळेस समितीला आक्षेपार्ह संशयास्पद असे काही आढळले नाही .
   अभा अंनिस ने यावेळी पोलीस दलांनी गुप्त गस्ती पथक गठीत करून तसेच गुप्त माहिती काढुन अनामिक भीती- दहशत पसरवणाऱ्या मानसिक विकृत व्यक्तीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे. अभाअंनिसचे राष्ट्रीय सरचिटणीस हरीश देशमुख,भंडारा अभाअंनिसचे जिल्हापदाधिकारी जिल्हाध्यक्ष मदन बांडेबूचे, जिल्हा सचिव मूलचंद कुकडे,प्रभारी जिल्हा संघटक डि. जी. रंगारी व रत्नाकर तिडके ,एस. एस. चव्हाण यांचे वेळोवेळी मार्गदर्शन या प्रकरणात प्राप्त होत आहे.

Post a Comment

0 Comments