Advertisement

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

१४ एप्रिल हा विश्वरत्न महामानव तथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवस.आधुनिक भारताच्या सर्वांगीण उभारणीमध्ये ज्या नेत्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे,त्यात बाबासाहेब आंबेडकर अग्रस्थानी आहे.जातीनिर्मूलन,स्त्री-पुरुष समता,सर्वांना शिक्षण,धर्मचिकित्सा ही मूलभूत विषय घेऊन त्यांनी लढे उभे केले.त्यांनी सर्व वंचित,दुबळे,पीडित यांना अस्तित्व,ऊर्जा,अस्मिता आणि प्रकाश दिला.१९२७ मध्ये मागासवर्गीय समाजाला पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.१९३० मध्ये मंदिरात सन्मानाने प्रवेश मिळावा यासाठी नाशिकला काळाराम मंदिर सत्याग्रह केला. माणुसकीच्या आग्रहासाठी झालेल्या या सत्याग्रहांनी देशभर दलित समाजात अस्मिता जागवली.'शिक्षणाची कास धरा, संघटित व्हा आणि संघर्ष करा'हा अद्वितीय गुरुमंत्र दिला.
     बाबासाहेबांनी १९२० ला 'मूकनायक' हे मराठी साप्ताहिक'प्रबुद्ध भारत'हे नियतकालिक सुरू केले.'मूकनायक',बहिष्कृत भारत' 'जनता' अशी वृत्तपत्रे सुरू करून सामाजिक प्रबोधन केले.शोषितांच्या आवाज बुलंद केला.१९२४ साली'बहिष्कृत हितकारिणी सभा'स्थापन केली.१९२७ मध्ये'समाज समता संघ'स्थापन केला.'इंडिपेडन्ट लेबर पार्टी'१९३६ मध्ये तर 'शेड्युल कास्ट फेडरेशन'ही संस्था १९४२ मध्ये निर्माण केली.या सर्व प्रयोगांतुन त्यांनी सामाजिक बांधणी केली.त्यांनी आपल्या बांधवांना उपदेश केला की,तुम्हीच तुमची गुलामगिरीतून मुक्तता करून घेतली पाहिजे.देवांवर किंवा एखाद्या महानायकांवर विसंबून राहू नका. तीर्थयात्रा,पूजापाठ,उपासतापास करून तुमचं काहीही कल्याण होणार नाही.माझ्या बांधवांनो,नशिबावर विश्वासू ठेवू नका.तुम्ही तुमच्या मेहनतीवर,ताकतीवर विश्वास ठेवा.आंबडकरांनी मुक्या लोकांना बोलते केले.त्यांनी लंगड्या लोकांना चालते केले.दुबळ्या लोकांना सामर्थ्यवान बनवले.त्यांचे सारे आयुष्य माणसांच्या मुक्तीसाठीपणाला लावले.१९४२ साली बाबासाहेब म्हणाले होते की,कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील स्रियांच्या प्रगतीवरून मोजली पाहिजे.स्रिया गुलाम नाहीत.त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत.हिंदू कोड बिलाद्वारे सर्व स्रियांना कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी लढले.त्यांनी दिलेल्या लढ्यात त्यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. एक दिवस त्यांनीच प्रत्येकाला मताधिकार,आणि वैचारिक स्वातंत्र्य।च्या मुलभूत अधिकार प्रदान करणारी अलौकिक राज्यघटना भारतीय लोकशाहीला प्रदान केली.न्याय,स्वातंत्र्य,समता,बंधुता व धर्मनिरपेक्ष या मानवी मूल्यांची प्रेरणा तर या संविधानातून त्यांनी दिलीच, शिवाय या मूल्याविरुद्ध जाणारी माणसे आणि प्रवाह हे समाजाचे शत्रू असल्याचा संस्कारही त्यातून त्यांनी दिला.भारतीय संविधानाचे अधिष्ठान समता आहे.लोकांच्या कल्याणासाठी सरकार खूप झटेल.देशभर हा संदेश गेला पाहिजे.(कलम ३८),मूठभर लोकांच्या हातात देशातील संपत्ती व उत्पादनाची साधने एकवटणार नाही हे सरकार बघेल.सामान्य लोकांचे हाल होणार नाही. अशी व्यवस्था सरकार करेल.(कलम ३९ सी)मात्र,आपल्या देशात दिवसेंदिवस विषमता वाढत आहे.श्रीमंत अधिक श्रीमंत तर,गरीब अधिक गरीब होत आहे.वरच्या एक टक्का श्रीमंतांकडे ५० टक्के संपत्ती व उत्पन्न आहे.तर,४७ टक्के बालके कुपोषित,भारतात तीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची नौबत आली.३० टक्के भारतीयांना दारिद्र्य व अभावग्रस्त जीवन जगावे लागत आहे.देशातील हे चित्र बाबासाहेबांना अभिप्रेत होते का?
     बाबासाहेबांनी लोकशाहीबरोबरच धर्मनिरपेक्ष राज्यघटनेचाही पुरस्कार केला.कोणत्याही एका धर्माला विशेष महत्त्व नाही.सर्व धर्म समान मानले आहे.धर्म ही व्यक्तिगत बाब मानण्यात आली आहे.समता,स्वातंत्र्य,बंधुता आणि सामाजिक न्याय बहाल करणारी उच्चतम लोकशाही मूल्ये संविधानाच्या उद्देशिकेत नमूद आहे. भारत हे बहुवांशिक,बहुधर्मीय बहुभाषिक,बहुसांस्कृतिक राष्ट्र आहे. भारताची विविधता हेच देशाचे वैशिष्ट्य आहे.आणि देश टिकवायचा तर या विविधतेचे संरक्षण धर्मनिरपेक्ष लोकशाहीचं करू शकते.आज भारतात सर्वत्र धार्मिक द्वेषाची आणि असहिष्णुतेची बीजे काही भोंदू धर्मगुरू व वर्चस्ववादी धार्मिक लोकांकडून रोवली जात आहे.काही लोकं चेतावणी देणारी भाषणे करतांना दिसून येतात.अशी भाषणे धार्मिक विष पेरून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहचू शकते.अशा वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बंधुता,धर्मनिरपेक्ष लोकशाही विचारधाराचं देशाला एकसंघ ठेवू शकते.आपण राष्ट्र म्हणून उभे राहायचे असेल तर आपल्याला बाबासाहेबांचेच विचार पायाभूत मानावे लागतील.
  -✍️राजेंद्र पाडवी, राज्यमहासचिव बिरसा फ़ायटर्स. मो.9673661060

Post a Comment

0 Comments