Advertisement

महाराष्ट्रातील जिल्हा भंडारा येथून 7-8 कि. मी. अंतरावर असलेल्या "डोडमाझरी (टेकेपार) येथील घटना.

      दि.27 मार्च 2022 ची घटना आहे. डोडमाझरी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा फार जुना असल्याने जीर्नावस्थेत आहे.त्यामुळे गावातील बौध्द बांधवांनी जीर्न अवस्थेत असलेल्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे विसर्जन करून त्या ठिकाणी नविन पुतळा उभारण्याचे ठरविले आणि त्यासाठी कामाला लागले.

         लोकांनी कामाला सुरूवात केली असता तेथील जातीवादी लोकांनी कामात अडथळा आणून काम रोकले. गावात बौध्द लोकांची जनसंख्या कमी असल्याने त्या गावातील इतर समाज एक झाला आणि होत असलेले काम रोकण्यात आले.यामध्ये सर्व गोंड गोवारी,ढीवर,गवळी,तेली,माळी,कुणबी आणि इतर लोक एका बाजूला आणि आंबेडकरी जनता एका बाजूला.

     हा प्रकार बाजूला लागून असलेल्या टेकेपार येथील आंबेडकरी लोकांच्या लक्षात आला .त्यामुळे टेकेपार येथील लोकांनी सर्व कामाला सुटी ठेवून काम करण्याचे ठरविले.दुस-या दिवसी म्हणजे दि.28/3/2022 ला सर्व डोडमाझरी-टेकेपार येथील आंबेडकरी लोकांनी काही प्रमाणात काम केले,परंतु त्यांचे असलेले नेते यांच्या हस्तक्षेपा मुळे पोलीस चौकी लावून काम बंद करण्यात आले.गावातील वातावरण फार दुषीत झाले आहे. डोडमाझरी येथील obc लोकांनी त्यांच्या मोहल्यात असलेल्या बोरींग मधून पाणी भरण्यास मज्जाव केलेला आहे आणि बुध्दीष्ट लोकांच्या किराणा दुकानातून व पानटपरीतून कोणतेही सामान न घेण्याचे ठरविले आहे.

     मुद्दाम एक सांगावयाचे म्हणजे आरक्षणाच्या भरवस्यावर निवडून आलेल्या पुढा-यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उमारण्यात येवू नये,या साठी प्रयत्न करीत आहे,ही किती लाजरवाणी गोष्ट आहे.

      एवढे प्रकरण होवून ही स्वतःला आंबेडकरी पक्षाचा समजणारा नेता अजून या गावी आला नाही. त्यामुळे गावातील लोकां मध्ये भीतीचे वातावरण आहे.

     त्यामुळे आता तरी सर्व आंबेडकरी नेत्यांनी पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी एक होवून, बाबासाहेबांचा लेकरू समजून डोडमाझरी टेकेपार येथील लोकांना साथ देवून बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास मदत करावी,अशी येथील आंबेडकरी जनतेची विनंती आहे. जयभीम🙏🙏🌹🌹

Post a Comment

0 Comments