दापोली: जोपर्यंत मला न्याय मिळत नाही व दोषी, बोगस, भ्रष्टाचारी अधिका-यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही, असा निर्धार करत जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपले 253 वे उपोषण दापोलीत सुरूच ठेवले आहे. उपोषणाचे निवेदन दापोलीचे तहसीलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांना दिले आहे.
एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या वर दोषी, भ्रष्टाचारी व बोगस अधिका-यांना पाठीशी घालणे,शिक्षक कर्मचा-यांचा छळ करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, जातीभेद करणे,विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी इत्यादी वरिष्ठ अधिका-यांचे आदेश दडपून ठेवणे, शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे मूळ कागदपत्रे लपवून ठेवणे,दिशाभूल करणारे पत्रव्यवहार करणे,आरोपीलाच चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करणे इत्यादी 31 प्रकारचे गंभीर दोषारोप आहेत. सदर दोषी अधिका-यांना राजकीय पदाधिकारी पाठीशी घालत असल्यामुळे अद्याप कारवाई होत नाही.
नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची आग्रा विद्यापिठाची डिग्री शिक्षण विस्तार अधिकारी पदाधिकारी अवैद्य ठरविण्यात आली आहे. तसा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांनी दिलेला आहे. तसेच नंदलाल शिंदे हे महिला कर्मचा-यांचा छळ करणे,अनेक शिक्षकांना त्रास देणे व बोगस डिग्रीत दोषी ठरले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. अशा बोगस व वादग्रस्त दोन्ही शिक्षण विस्तार अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करावे, माझी 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करावे,अशा एकूण 28 मागण्यांसाठी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी पांगारवाडी दापोली येथे उपोषण सुरूच ठेवले आहे.
0 Comments