Advertisement

माझी तुलना अण्णा हजारेंशी नको : सुशिलकुमार पावरा शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे 250 वे उपोषण


दापोली :ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणांशी माझी तुलना करू नका, असे आवाहन 250 वेळा उपोषण करणारे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी प्रेषकांना केले आहे. शिक्षक सुशिलकुमार पावरा यांच्या उपोषणांची संख्या बघून वाटसप व फेसबुकवर "महाराष्ट्राचा दुसरा अण्णा हजारे ","आदिवासींचा अण्णा हजारे" अशा पोस्ट सुशिलकुमार पावरा यांच्या बद्दल पडत आहेत.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 15 उपोषण केली .त्यांच्या उपोषण व आंदोलनांमुळे माहिती अधिकार कायदा,जनलोकपाल कायदा सारखे चांगले कायदे या देशाला मिळाले.अण्णांच्या आंदोलनांमुळे सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय तयार झाले.अण्णा हजारे हे माझ्या साठी आदर्शवतच आहेत. त्यामुळे माझी तुलना अण्णा हजारेंशी करू नका, असे मत शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केले आहे. 
         250 वेळा उपोषण व आंदोलन करताना व सरकारी यंत्रणेशी लढताना मला खूप त्रास सहन करावा लागत आहे. एका शिक्षकाला 250 करूनही न्याय मिळत नसेल तर ही न्यायव्यवस्थेतील मोठी शोकांतिका आहे. दहा हजार पेक्षा अधिक वेळा पत्रव्यवहार व पाच हजार पेक्षा अधिक वेळा अधिका-यांना स्मरणपत्रे पाठवूनही न्याय मिळत नसेल तर उपोषण करत राहणे,संघर्ष करत राहणे,हाच एकमेव मार्ग माझ्या साठी शिल्लक राहिला आहे,म्हणून मी नाईलाजाने वारंवार उपोषणाला बसत आहे.आयुक्त ,राज्य माहिती आयोग, कोकण खंडपीठ यांनी दिनांक 2 नोव्हेंबर 2015 रोजीच्या आदेशानुसार जिल्हा परिषद रत्नागिरीला माझ्या प्रकरणात तब्बल दोन लाख दंड केला आहे. कोकण आयुक्त, राज्य माहिती आयोग आयुक्त, शिक्षण आयुक्त पुणे, उपसंचालक कोल्हापूर, जिल्हाधिकारी रत्नागिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी इत्यादी वरिष्ठांचे आदेश जिल्हा परिषद रत्नागिरी मधील अधिका-यांनी दडपून ठेवली त्यामुळे माझ्या वर अधिक अन्याय होत गेला.
           दोषी,भ्रष्टाचारी,बोगस अपंग प्रमाणपत्र धारी व षडयंत्र कारी विजय दाजी बाईत तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली व बोगस डिग्री धारक , दोषी श्री.नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली या दोन्ही बोगस विस्तार अधिका-यांना सेवेतून बडतर्फ करा,31 दोषारोपीत श्री. एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा व माझी उर्वरीत 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा तसेच 28 मागण्यांच्या तात्काळ पूर्तता करा .या मागणी साठी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी हे उपोषण सुरू ठेवले आहे.

Post a Comment

0 Comments