Advertisement

शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे 249 वे उपोषण




दापोली  :माझा लढा हा सर्वसामान्य माणसाचा लढा आहे.अजस्त्र सरकारी यंत्रणेशी लढताना एका सामान्य माणसाला किती त्रास सहन करावा लागतो, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माझे प्रकरण आहे. माझीच मूळ कागदपत्रे मला परत मिळावीत म्हणून माझ्या सारख्या सर्वसामान्य शिक्षकाला 249 पेक्षा अधिक वेळा उपोषण करावे लागते, ही फार मोठी शोकांतिका आहे. अनेकदा विनंती अर्ज करूनही मला माझी मूळ कागदपत्रे शिक्षण विभागाने दिली नाही, माझी मूळ कागदपत्रे संबंधित अधिका-यांनी लपवून ठेवली.10000/ पेक्षा अधिक वेळा अधिका-यांना स्मरणपत्रे पाठविली आणि नाईलाजाने माहिती अधिकार अर्ज केला.माहिती अधिकार अर्जाचा निकाल माझ्या बाजूने लागला. आयुक्त ,राज्य माहिती आयोग, कोकण खंडपीठ यांनी दिनांक 2 नोव्हेंबर 2015 रोजीच्या  आदेशानुसार  जिल्हा परिषद रत्नागिरीला माझ्या प्रकरणात तब्बल दोन लाख दंड केला आहे. कोकण आयुक्त, राज्य माहिती आयोग आयुक्त, शिक्षण आयुक्त पुणे,  उपसंचालक कोल्हापूर, जिल्हाधिकारी  रत्नागिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी इत्यादी वरिष्ठांचे आदेश तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक एकनाथ आंबोकर यांनी लपवून ठेवली त्यामुळे माझ्या वर अधिक अन्याय होत गेला.एवढा मोठा पत्रव्यवहार करून सुद्धा न्याय मिळत नसेल तर मी न्यायासाठी उपोषण केले म्हणून माझ्या वर उपोषणाचे क्षुल्लक कारण दाखवत एकतर्फी कारवाई राजकीय दबावाखाली करण्यात आली. उपोषण करणे हा गुन्हा आहे का? असा सवाल उपोषण कर्ते शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी प्रशासनाला केला आहे.  


            मी खरे शिक्षण घेतले म्हणून बोगस व दोषी अधिका-यांनी माझी मूळ कागदपत्रे लपवून ठेवली, गायब केली. जे अधिकारी शिकलेच नाहीत, ज्यांनी पैशांनी विकत पदव्या मिळवून नोकरीत लागले व ज्यांच्या पदव्या चौकशीत खोट्या ठरल्या आहेत, अशा बोगस व दोषी अधिका-यांना जिल्हा परिषद रत्नागिरी  प्रशासनाने नोकरीवर ठेवले आहे. ही अन्याय कारक बाब आहे. चोर सोडून संन्याशाला शिक्षा देण्यात आली आहे. 


             जोपर्यंत  दोषी व  बोगस, भ्रष्टाचारी  अधिका-यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत माझे उपोषण मी सुरूच ठेवणार आहे असा निर्धार करत  जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी  आपले 249 वे उपोषण दापोली येथे सुरूच ठेवले  आहे.आर.एम.दिघे गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांनी पावरा यांनी  दिलेल्या उपोषणाच्या निवेदनाची दखल घेतली आहे.दिनांक 16/03/2022 रोजीच्या पत्राद्वारे गटविकास अधिकारी दापोली यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना मागण्यांबाबत कार्यवाहीसाठी लेखी पत्राद्वारे  कळविले आहे.   दोषी,भ्रष्टाचारी,बोगस अपंग प्रमाणपत्र धारी व षडयंत्र कारी श्री. विजय दाजी बाईत तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली व बोगस डिग्री धारक , दोषी श्री.नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली या दोन्ही बोगस विस्तार अधिका-यांना सेवेतून बडतर्फ करा,31 दोषारोपीत  श्री. एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा व माझी उर्वरीत 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा तसेच 28 मागण्यांच्या तात्काळ पूर्तता करा .या मागणी साठी पावरा यांनी हे उपोषण सुरू ठेवले आहे

Post a Comment

0 Comments