भारतीय इतिहासातील थोर क्रांतिकारक व 1858 अंबापानी स्वातंत्र्य संग्रामातील नेतृत्व खाज्या नाईक यांचे 12 एप्रिल रोजी शहिददिवसा निमित्ताने दरवर्षी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या उनपदेव येथे दरवर्षी हा दिवस क्रांतिवीर खाज्या नाईक प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे आज रोजी चिचोरा येथे आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्त्याची कार्यक्रम नियोजन बाबत महत्वूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत
कार्यक्रमाची रूपरेषा नियोजन , कामाची विभागणी करण्यात आली तसेच परिसरातील ढोल, मांदल , बासरी, बिरी असे अनेक आदिवासी सांस्कृतिक देखावे व कलाकार उपस्थिती राहणार आहे व आदिवासी सांस्कृतिक मूल्य, इतिहास , सामाजिक समस्या , शिक्षण, आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण मुद्यावर तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन देखिल करण्यात येणार आहे. या बैठकीला जेष्ठ विचारवंत वाहरू सोनवणे, युवा कवी संतोष पावरा, चुनिलाल ब्राम्हणे चंद्रसिंग बर्डे, आकाश मोरे दीपक मगरे,
सुभाष नाईक सतीश पवार, गंगाराम राहसे वनिता पटले , मंगेश बर्डे सत्तर दादा ठाकरे, सतिलाल शेमळे, शंकर ठाकरे, राहुल पवार, योगेश मगरे, वनसिंग पवार, विजय वळवी, प्रकाश उखलदे, गुड्या बागले, लक्ष्मण दादा दिगंबर प्रताप आदी जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाहरू सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन संतोष पावरा यांनी केले तसेच आभार किशोर ठाकरे यांनी केले ! कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बैठकीत ठरल्यानुसार कार्यकर्ते मेहनत घेत आहे. आणि 12 एप्रिल रोजी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आदिवासी एकता परिषद व खाज्या नाईक उत्सव समितीने केले आहे.
आपले
आदिवासी एकता परिषद व क्रांतिवीर खाज्या नाईक उत्सव समिती, नंदुरबार
0 Comments