Advertisement

उपकेंद्र, कोडीद ता.शिरपूर येथे ‘मानव विकास मिशन कार्यक्रम’ अंतर्गत गरोदर महिला, बालकांची तपासणी तसेच गरोदर मातांना योगासन व प्राणायम ह्याचे महत्व व प्रशिक्षण संपन्न.!


    मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने मानव विकास कार्यक्रम राज्यातील अनेक जिल्ह्यात, तालुक्यात सुरू केला आहे. त्यात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष लक्ष देण्यात आले. याप्रमाणे प्राधान्याने कुपोषित बालके, कमजोर माता, गरोदर महिला यांची परिपूर्ण तपासणी,त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे, त्यानुसार उपचाराची सुविधा करणे अशा सर्वच बाबींचा अंतर्भाव कऱण्यात आला आहे.
     प्राथमिक आरोग्य केंद्र, बोराडी अंतर्गत उपकेंद्र कोडीद येथे आज "मानव विकास मिशन कार्यक्रम' अंतर्गत उपकेंद्र कोडीद, उपकेंद्र फत्तेपूर, उपकेंद्र मालकातर, उपकेंद्र बुडकी येथील अंतर्गत १०० गरोदर माता व बालके ० ते ६ महिने मधील २४ व ६महिने ते २ वर्षांपर्यंत १० असे एकूण ३४ बालकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले.
    तसेच गरोदर मातांना योगाचे महत्व सांगतांना उपस्थित योगगुरू श्री. तुषार शिवनेकर सर ह्यांनी सांगितले की, ह्या दगदगत्या जिवनमानात गर्भाचे शारीरिक व मानसिक, बौद्धिक वृद्धीसाठी व गरोदर मातांना सर्व प्रकारचे लहान मोठे विकार व मानसिक विकास ह्यासाठी "योगासन" हा पर्याय आहे.
ह्याचावापर करून अनेक जागृत लोकांनी आपले आपले आयुष्मान वाढवले आहे. योगासाठी शहरांत हजारो रुपये खर्चीले जातात ही सत्यता नाकारता येत नाही.
     ह्यावेळी स्रीरोग तज्ञ डॉ.राजपूत सर, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप वळवी, उपकेंद्र कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, योगगुरू श्री.तुषार शिवनेकर सर उपकेंद्र कोडीद, उपकेंद्र मालकातर, उपकेंद्र फत्तेपूर, उपकेंद्र बुडकी येथील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गट प्रवर्तक, आशा वर्कर्स कर्मचारी तसेच सर्व आरोग्य कर्मचारी कॅम्प ठिकाणी उपकेंद्र कोडीद येथे उपस्थित होते.

    ह्यावेळी उपकेंद्र कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी सगळ्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments