Advertisement

त्या डाॅक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करून बडतर्फ करा.नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, गोंडवाणा कृती संघर्ष समिती, बिरसा फायटर्स ची संयुक्त मागणी

✍️एसके जी पंधरे- विदर्भ चिफ व महाराष्ट्र राज्य सहसंघटक, राष्ट्रीय  विश्वगामी पत्रकार संघ (भारत सरकार मान्य)


तुमसर ( 24 मार्च ) :- भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर कळस्कर यांनी आपल्याच आरोग्य केंद्रातील परिचर नारायण उईके यांना दि.22 मार्च 2022 ला लाथा बुक्क्या व काठीणे अमानुष मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली. नारायण उईके यांनी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशन गोबरवाही येथे तक्रार दाखल केली आहे. 



घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार पाटील यांनी डॉ. कळस्कर यांना अमानुष मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक केली असुन त्यांच्यावर ॲट्रासिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    

सदर प्रकरण अत्यंत गंभीर असुन मानव जातीला काळीमा फासणारी आहे त्यामुळे अशा प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर कळस्कर यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून त्वरित बडतर्फ करण्यात यावे याबाबतचे निवेदन बिरसा फायटर्स व आदिवासी संघटनांच्या वतीने मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व संबंधित अधिकारी यांना देण्यात आले.

 

यावेळी निवेदन देतांना बिरसा फायटर्सच्या वतीने बिरसा फायटर्स चे विदर्भ महासचिव शामरावजी उईके, जिल्हा अध्यक्ष पी बी कंगाले भंडारा, तुमसर तालुका अध्यक्ष लिलाधर चांदेवार तसेच धर्मराजभाऊ भलावी जिल्हाध्यक्ष नँ.आ.पि.फे.भंडारा, प्रभाताई पेंदाम जिल्हाध्यक्ष नँ.आ.म.फे.भंडारा, राजकुमार परतेती ता.अध्यक्ष ऑ.इं.आ.ए.फे.तुमसर, जनार्धन पुराम ता.अध्यक्ष नँ.आ.पि.फे.साकोली, हरिभाऊ येळणे ता.महासचिव नँ.आ.पि.फे.साकोली, धनराज ईळपाचे ता.सचिव ऑ.इं.आ.ए.फे.तुमसर, ओमप्रकाश कुंभरे ता.कोषाध्यक्ष नँ.आ.पि.फे.साकोली, लक्ष्मीकांत सलामे आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments