Advertisement

लाखनी येथे वनक्षेत्र कार्यालय व ग्रीनफ्रेंड्स तर्फे 'जागतिक वन दिन' विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला


उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी तयार करण्यात आला कृत्रिम पाणवठा

✍️एसके जी पंधरे- विदर्भ चिफ व महाराष्ट्र राज्य सहसंघटक, राष्ट्रीय  विश्वगामी पत्रकार संघ (भारत सरकार मान्य)

बाईक रॅलीचे आयोजन व वृक्षारोपण कार्यक्रम

     लाखनी:-वनक्षेत्र कार्यालय लाखनी तर्फे 21 मार्च जागतिक वन दिन  ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीच्या सहकार्याने विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.सर्वप्रथम वनक्षेत्रपाल सुरज गोखले यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व  वनपरिक्षेत्र अधिकारी- कर्मचारी आणि ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे पदाधिकारी  निसर्गमित्र पंकज भिवगडे, योगेश वंजारी, सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे ,नितीश निर्वाण,चेतन निर्वाण यांचे उपस्थितीत  लाखनी वनक्षेत्र कार्यालयात हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली.
जागतिक वनदिनाच्या माध्यमातून  विविध गावांमध्ये पर्यावरण व वने संरक्षण यावर जागृती करीत वनकर्मचाऱ्यांची बाईक रॅली सालेभाटा  जवळील पाऊलदवना जंगलक्षेत्रात पोहचली.त्या ठिकाणी वन्यजीवांची उन्हाळ्यात होणारी होरपळ लक्षात घेऊन  तहान भागविण्यासाठी कृत्रीम पाणवठा वनकर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून तयार करण्यात आला.  यावेळी जागतिक जल दिनाचे महत्व पटवून देत जलसंचय करण्यात आला. यानंतर बाईक रॅलीचे आगमन उमरझरी व बाम्पेवाडा येथे झाले. त्याठिकाणी सुद्धा परिसरात वनदिनाच्या निमित्ताने लोकजागृती करण्यात आली. सायंकाळी जांभळी नर्सरी येथे आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणी वृक्षारोपण करून दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दरम्यान परतीच्या वेळी जंगलात 2 ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळाल्याने कर्मचारी- अधिकारी यांनी आगीवर नियंत्रण आणण्याकरिता अथक प्रयत्न केले.एकप्रकारे जागतिक वन दिन प्रत्यक्ष स्वरूपात  जंगलाचे संवर्धन करून साजरा केला. ग्रीनफ्रेंड्स लाखनीचा सर्पमित्र सलाम बेग याने सुद्धा आईपासून 12 तास विलग झालेल्या वानराच्या पिल्लाला ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायत स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबेसेडर प्रा.अशोक गायधने यांचे मार्गदर्शनाखाली कार्य करून वानराच्या छोटया पिल्लाला त्याच्या आईशी गाठभेट जागतिक वन दिनी करून दिली व खऱ्या अर्थाने  जागतिक वनदिन साजरा केला.
 जागतिक वन दिन साजरा करण्याकरिता लाखनी वनक्षेत्र कार्यालयाअंतर्गत असलेले सर्व अधिकारी ,वनकर्मचारी,महिला वनकर्मचारी तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबच्या चमूने अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments