Advertisement

उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून द्यावे असी मागणी आरोग्य अधिकारी यांना बिरसा फायटर्सने केली

 

तळोदा(प्रतिनिधी)उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून द्यावे यासाठी बिरसा फ़ायटर्सने आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री,आदिवासी विकासमंत्री,जि.प.अध्यक्षा यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार हा एक आदिवासीबहुल जिल्हा आहे.अनेक गरीब रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे रोगांचे तपासणी न करता आजार अंगावरच काढतात.उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध झाल्यास गरीब रुग्णांना पोट, मूत्राशय,किडनी,लिव्हर,पित्ताशय,किडनी स्टोन,स्वादुपिंड,प्लीहा,थॉयराईड,गर्भाशय यासारख्या अवयवांची तपासणी होऊन योग्य निदान करता येईल.तसेच,गरोदरपणात पोटातील गर्भाची स्थिती लक्षात येऊन गर्भाची वाढ,दोष,गर्भातील गाठी,व्यंगाची माहिती होऊन योग्य निदान करता येईल व मातेची काळजी ही दूर होण्यास मदत होईल.यासाठी परिसरातील गरीब रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे. निवेदनावर बिरसा फ़ायटर्सचे जिल्हाध्यक्ष भरत पावरा, तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,मालदाचे  शाखा उपाध्यक्ष हेमंत ठाकरे,सल्लागार विजय खर्डे,सचिव हिरामण खर्डे,विष्णू पावरा, लालसिंग पावरा,स्वप्निल ठाकरे, प्रताप पावरा,रतीलाल वसावे,नितेश वसावे, मंगल रावताळे,गोविंद खर्डे यांच्या सह्या 

Post a Comment

0 Comments