Advertisement

बिरसा फायटर्स़ आडगांव अध्यक्षपदी योगेश रावताळे तर सचिवपदी दिनेश पवार यांची नियुक्ती

  

आडगाव येथे बिरसा फायटर्स गांव शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर!


 शहादा प्रतिनिधी :- शहादा तालुक्यातील आडगाव येथे दिनांक १७ मे २०२६ रोजी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी व मार्गदर्शक चंद्रसिंग पवार यांच्या नेतृत्वाखाली बिरसा फायटर्स गाव शाखा -आडगांव ची नवीन कार्यकारिणी जाहीर करून नियुक्ती पत्र देण्यात आले. गाव अध्यक्षपदी योगेश रावताळे यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्ष विरसिंग पवार सचिव दिनेश पवार, कार्याध्यक्ष कृष्णा खर्डे, कोषाध्यक्ष सहदेव पवार , सहसचिव किरण पवार,सल्लागार जितेंद्र पवार,संघटक चेतन खर्डे, प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र पवार, महिला प्रतिनिधी मनिषा रावणाने, सदस्य चेतन ब्राह्मणे, रविंद्र पवार, भिमराव ठाकरे, पुष्पाताई रावताळे अशी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बिरसा फायटर्स ही आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एक आक्रमक सामाजिक संघटना आहे. दिवसेंदिवस संघटनेशी नवं नवीन तरूण कार्यकर्ते सहभागी होत असून संघटनेच्या शाखा वाढतच आहेत.
                        नवनियुक्त सर्व पदाधिकारी व सदस्यांचे  जालिंदर पावरा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बिरसा फायटर्स़ नंदुरबार यांनी हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.कार्यक्रमाला बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन मोते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा, मार्गदर्शक चंद्रसिंग पवार, कोषाध्यक्ष पप्पू अवाया, जगदीश डुडवे सह असंख्य बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी भगवान बिरसा मुंडा की जय, क्रांतीवीर खाज्या नाईक की जय,बिरसा फायटर्स जिंदाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments