राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई येथे दिनांक २२ में २०२६ रोजी सुनावणी
नंदुरबार प्रतिनिधी: "जजपेक्षाही पोलिसांना जास्त पॉवर असतो, तो पॉवर दाखवतो तुला!" असे म्हणत जातीवाचक वाईट व अश्लील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत मला पोलीस कस्टडीत असतांना हाता पायांनी अमानुषपणे बेदम मारहाण करणाऱ्या श्री. श्रवण दत्त पोलीस अधिक्षक नंदूरबार, श्री. आषित कांबळे अपर पोलीस अधिक्षक नंदूरबार, श्री. हेमंत पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नंदूरबार व श्री. हेमंतकुमार पाटील पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे नंदूरबार यांच्यावर ॲस्ट्रासिटीचा, जातीवाचक व अश्लील व वाईट शिवीगाळ करणे,अमानुषपणे मारहाण करणे,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे,जीवे ठार मारण्याची धमकी देणे,पोलिस पदाचा दुरूपयोग केल्याबद्दल,माझा छळ, माझ्यावर अन्याय अत्याचार केल्याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी, कायदेशीर कडक कारवाई करावी व संबंधित पोलिस अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करणेबाबत संबंधित आरोपी पोलिस अधिकारी हे घटनेचे सी.सी. टीव्ही फुटेज पुरावे नष्ट करू शकतात म्हणून दिनांक २५/०९/२०२५ ते २९/०९/२०२५ रोजीचे पोलिस कस्टडीचे सी सी टिव्ही फुटेज चौकशीसाठी व मला न्याय मिळावा, यासाठी ताब्यात घेणेबाबत विनंती,अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज सुशिलकुमार जहांगीर पावरा यांनी अध्यक्ष, राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई यांच्या कडे दिनांक ०९/०२/२०२६ रोजी दिला होता.
त्या तक्रार अर्जाची दखल घेऊन दिनांक २२/०५/२०२६ रोजी राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई येथे सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. सुशिलकुमार जहांगीर पावरा यांची शहर पोलीस स्टेशन, नंदूरबार येथील पोलीस अधिकारी व या पोलीस ठाणेशी संबंधीत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचेविरोधात तक्रार अर्ज दिनांक ०९/०४/२०२६ रोजी प्राप्त तक्रार रापोतप्रा/तक्रार अर्ज/स्टॅम्प केस क्र. ४१३/२०२६ अन्वये आपण केलेल्या तक्रारीची प्राधिकरणाच्या खंडपीठाकडे नियमीत सुनावणीसाठी पाठवीण्यापुर्वीची छाननी / प्राथमिक सुनावणी दिनांक २२/०५/२०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता प्राधिकरण कार्यालयात ठेवण्यात आली आहे.तरी आपण आपले आधारकार्ड अथवा इतर फोटो असलेल्या ओळखपत्रासह व तक्रार अर्जासंबंधीत मूळ व पूरक कागदपत्रांसह हजर रहावे. आपली तक्रार दाखल केल्यास, तक्रार अर्जात नमुद केलेल्या प्रतिवादी यांना देण्यासाठी आपल्या तक्रार अर्जाच्या छायांकित प्रती (तक्रारअर्जात नमुद प्रतीवादींच्या संखेनुसार) सुनावणीवेळी सादर कराव्यात.असे पत्र (सिवि धाडारे) प्रशासकीय अधिकारी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई यांनी तक्रारदार सुशिलकुमार पावरा यांना दिनांक २१/०४/२०२६ रोजी पाठवले आहे.
पोलीस अधिक्षक श्रवण दत्त हे आपल्या पदाचा वर्दीचा ,अधिकाराचा ,दूरूपयोग करून अनेक निरपराध लोकांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून अटक करायला लावतात.९ सामाजिक कार्यकर्त्यांवर सुबुद्धीने हद्दपारी सारखी असंवेधानीक कारवाई करतात.पोलीस अधिक्षक यांच्या निषेधार्थ ठराव टाकून नंदुरबार वकील संघाच्यावतीने २ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील कोर्ट कामकाज बंद ठेवून बहिष्कार टाकण्यात आला.विविध संघटनांनी पोलिस अधीक्षक यांच्या निषेधार्थ देशभर निवेदन दिली.त्यामुळे पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण प्रकरणी पोलिस अधीक्षक श्रवण दत्त सह ४ पोलिस अधिकाऱ्यांवर अध्यक्ष राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण मुंबई कोणती कारवाई करतील, याकडे देशभरातील जनतेचे लक्ष लागून आहे.


0 Comments