Advertisement

पोलिस अधीक्षकांच्या हद्दपार आदेशाला विभागीय आयुक्तांची चपराक; १० दिवसांत स्थगिती!



राजकीय स्वरूपाचे गुन्हे असून गंभीर गुन्हे नाहीत, विभागीय आयुक्तांचा निष्कर्ष!

नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,बिरसा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष रविंद्र वळवी,भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, भारतीय स्वाभीमानी संघाचे राज्य सचिव रोहीदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वळवी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप मुसळदे,विधीतज्ञ तथा वकील राहूल कुवर अशा ९ सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी, राजकीय पुढाऱ्यांच्या इशा-यावर व सुपारी घेऊन सुडबद्धीने , भ्रष्ट पद्धतीने अवैध, बेकायदेशीर, अप्रमाणिकपणे आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरूपयोग करून नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिनांक २५/०३/२०२६ रोजी २ वर्षाकरिता नंदुरबार जिल्हा हद्दपारीचा आदेश काढला होता.९ सामाजिक कार्यकर्त्यांपैकी विधीतज्ञ तथा वकील राहूल कुवर यांनी पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या असंवेधानीक आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त नाशिक यांच्या कडे अपिल अर्ज दाखल केला होता.सामनेवाले नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा दत्ता पवार, पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे शहादा जिल्हा नंदुरबार विरूद्ध अपिलार्थी राहुल कुवर असा अपिलीय अर्ज दाखल करण्यात आला होता.त्या अपिलीय अर्जासोबत स्थगिती अर्ज सुद्धा दाखल करण्यात आला होता.अपिलार्थी यांचेविरुध्द दाखल गुन्हे हे राजकीय स्वरुपाचे असून गंभीर स्वरुपाचे नाहीत,असा निष्कर्ष काढत विभागीय आयुक्त नाशिक डॉ.प्रविण गेडाम यांनी पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशाला दिनांक ०६/०४/२०२६ रोजी स्थगिती दिली.त्यानंतर लगेच दिनांक १३/०४/२०२६ रोजी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,बिरसा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष रविंद्र वळवी , दिलीप मुसळदे यांच्या आदेशाला स्थगिती दिली.
                  आदेशात नमूद केले आहे की,अपिलार्थी यांच्या वर राजकीय स्वरूपाचे गुन्हे असून गंभीर स्वरूपाचे नाहीत,असा निष्कर्ष निघाला असल्याने व पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या जिल्हा हद्दपार आदेशाला केवळ १०-१५ दिवसांतच विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिल्याने पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी राजकीय पुढाऱ्यांच्या इशा-यावर ९ सामाजिक कार्यकर्त्यांवर सुबुद्धीने हद्दपारीची कारवाई केली असल्याचे समोर आले आहे.पोलीस अधिक्षकांच्या या असंवेधानीक आदेशाला विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिल्याने एक प्रकारची चपराक बसली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात हद्दपार कारवाई करणा-या पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या निषेधार्थ ठराव मंजूर करून दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकत कोर्ट कामकाज बंद ठेवले.बिरसा आर्मी,बिरसा फायटर्स,आदिवासी युवा सेना महाराष्ट्र,युवा आदिवासी संघटना,अशा विविध सामाजिक संघटनांकडून पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या या असंविधानिक हद्दपार कारवाईविरोधात विविध ठिकाणी निवेदने देऊन निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments