Advertisement

९ पोलिसांना फाशीची शिक्षा या न्यायालयाच्या निर्णयाचे बिरसा फायटर्स संघटनेकडून स्वागत व समर्थन !



नंदुरबार मधील ४ पोलिस अधिकाऱ्यांची CBI चौकशी करून कठोर शिक्षेची मागणी

नंदुरबार प्रतिनिधी: - तामिळनाडू येथे कोरोना काळात उशीरापर्यंत दुकान उघडे ठेवले या कारणावरून पोलिस कोठडीत ९ पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करून व्यापारी वडिल व मुलाची हत्या केली ,या मृत्यू -हत्या प्रकरणी माननीय मदुराई सत्र न्यायालयाने ९ आरोपी पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे,त्या निर्णयाचे आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून स्वागत व समर्थन करीत आहोत,तामिळनाडूतील निर्णया प्रमाणेच महाराष्ट्रातील नंदुरबार येथे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त सह ४ पोलिस अधिकाऱ्यांनी तक्रारदार सुशिलकुमार पावरा यांना पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर त्यांच्या वडिलांची हत्या प्रकरणी संबंधित आरोपी ४ पोलिस अधिकाऱ्यांची CBI चौकशी होऊन कायदेशीर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
                    देशात अनेक ठिकाणी पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी हे आपल्या पदाचा अधिकाराचा दुरुपयोग करून वर्दीचा धाक दाखवून चौकशीच्या नावाखाली अनेक निरपराध लोकांवर अमानुषपणे मारहाण करून हत्या करतात व प्रकरणाला खोटे व बनावट स्वरूप देऊन पुरावे नष्ट करतात. आपल्या भारत देशात मागील ५ वर्षात पोलिस कोठडीत ८०६ कैद्यांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक १०१ कैद्यांचा मृत्यू फक्त महाराष्ट्रातच झाले आहेत. बिहार,यूपीलाही महाराष्ट्राने मागे टाकत सर्वाधिक कैद्यांना मारहाण करून हत्या केली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.
                         अपराधावर कायद्याचा विजय,असत्यावर सत्याचा विजय असे म्हणत या निर्णयाचा जनतेने स्वागत केले आहे. भ्रष्ट व अत्याचारी पोलिसांसाठी हा निर्णय एक प्रकारची चपराक असून कायदा सर्वांसाठी समान असून कायदा जिवंत आहे,असा चांगला संदेश जनतेपर्यंत पोहचला आहे.नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त,अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलिस ठाणे नंदुरबारचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार जहांगीर पावरा यांना पोलिस कोठडीत जातीवाचक ,अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण प्रकरणी माननीय मुख्य न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय नंदुरबार यांच्या समोर दिनांक ३०/०९/२०२५ रोजी तक्रार नोंद करण्यात आली आहे.
                       पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी व इतर पुढाऱ्यांकडून सुपारी घेऊन, पैसे घेऊन सुशिलकुमार पावरा यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या विरोधातली तक्रार मागे घेत नाही म्हणून सुशिलकुमार पावरा यांच्या वडिलांची जहांगीर फेंदा पावरा यांची हत्या करण्यात आली, संशयास्पद मृत्यु एका तलावात आढळून आला.,त्या हत्येमागे याच पोलिस अधिकाऱ्यांचा हात आहे.अमानुषपणे मारहाण करून मृत्यू प्रकरणी न्यायालयाने ९ पोलिसांना मृत्यूदंड ची शिक्षा सुनावली.त्याच पद्धतीची कठोर शिक्षा सुशिलकुमार पावरा यांना पोलिस कोठडीत मारहाण प्रकरणात व वडिलांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांचा हात असल्याच्या संशयावरून पोलिस अधीक्षक श्रवण दत्त सह अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व हेमंतकुमार पाटील या ४ पोलिस अधिकाऱ्यांना आरोपी ठरवून फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मयत जहांगीर फेंदा पावरा यांचे परिवारातील सदस्य करीत आहेत.

Post a Comment

0 Comments