धडगांवच्या बाजारात चंद्रकांत रघुवंशीच्या फोटोला बिरसा फायटर्सने जोडे मारले
धडगांव प्रतिनिधी : आदिवासी नेते तथा माजी क्रीडा मंत्री मा. पद्माकर वळवी यांना नंदूरबार जिल्ह्य़ात फिरू देणार नाही,अशी जीवे ठार मारण्याची धमकी देणा-या व आदिवासी समाजात तेढ निर्माण करणा-या श्री.चंद्रकांत रघुवंशी शिवसेना शिंदे गट नंदूरबार यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा,या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स संघटनेकडून पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे धडगांव यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,नाशिक विभागीय अध्यक्ष विजय पावरा, तालुकाध्यक्ष सुनिल तडवी,तालुका सचिव मुकेश पावरा,जयसिंग तडवी, गौतम वसावे,भिमराव पावरा,किरण पावरा,मोजा पावरा,मुकेश पावरा,विलास वसावे आदि असंख्य बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते.निम का पत्ता कडवा है,चंदूभैया भडवा है,चंदूभैया चलो जाव, या चंदूभैयाचे करायचे काय ,खाली डोक वर पाय,चंदूभैयाला उल्टा टांगा,चंदूभैया मूर्दाबाद अशा जोरदार घोषणा देत बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी धडगांवच्या बाजारात चंद्रकांत रघुवंशीच्या जोडे मारून निषेध व्यक्त केला.
चंद्रकांत सूर्यकांत शिवसेना शिंदे गट नंदूरबार परप्रांतीय नेते यांनी आदिवासी नेते तथा माजी मंत्री पद्माकर वळवी यांना नंदूरबार जिल्ह्य़ात फिरू देणार नाही, अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी नंदुरबार जिल्ह्य़ातील धडगांव येथील एका कार्यक्रमात दिली आहे.चंद्रकांत रघुवंशी हा बिहार, मध्यप्रदेश मधून नंदूरबार जिल्ह्यात घुसखोरी करून नंदूरबार जिल्ह्य़ातील मूळनिवासी आदिवासी नेत्यांनाच धमकी देत आहे, हे आम्ही जिल्ह्य़ातील आदिवासी बांधव कदापी खपवून घेणार नाहीत. आदिवासी जिल्ह्य़ात राहून आदिवासींनाच धमकी देणे , ही एक निंदनीय बाब आहे.चंद्रकांत रघुवंशी यांच्या अशा बेताल व वादग्रस्त वक्तव्याचा आम्ही धडगांव तालुका समस्त आदिवासी समाजातर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो.पद्माकर वळवी हे आदिवासी अभ्यासक व कायदेतज्ज्ञ आहेत. पद्माकर वळवी यांनी आदिवासींची बाजू धरून जे काही बोलले त्याचे आम्ही समर्थन करतो.जे कोणी आमच्या समाजाच्या बाजूने बोलत आहेत, त्या सर्व आदिवासी नेत्यांचे आम्ही जाहीरपणे समर्थन करीत आहोत. परंतु जे कोणी आदिवासींच्या विरोधात बोलत आहेत, आदिवासींना धमकावत आहेत, आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी करण्याच्या हेतूने बोलत आहेत. त्यांचा आम्ही जाहीर विरोध करीत आहोत.
आपले हक्क व अधिकार अबाधित राहावेत व मिळावेत यासाठी सरकार विरोधात आदिवासी समाज संतापलेला आहे.अशा परिस्थितीत चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी नेते पद्माकर वळवी यांना दिलेल्या धमकीमुळे आदिवासी समाजांत तीव्र संताप निर्माण झालेला आहे.चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी समाजाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, आदिवासी समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केलेले आहे.कायदा व सुवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे.म्हणून चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी समाजाची जाहीर माफी मागावी.चंद्रकांत रघुवंशीला आम्हीच नंदूरबार जिल्ह्य़ात फिरू देणार नाहीत.आम्ही चंद्रकांत रघुवंशीच्या तंगड्या तोडू,फिरायच्या लायकीचा राहणार नाही,असा जाहीर इशारा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी चंद्रकांत रघुवंशीला दिला आहे.
0 Comments