Advertisement

शैक्षणिक तालुकास्तरीय वीविद्ध गुनदर्शन स्पर्धेत कोचाळे शाळेचे यश

पालघर :सौरभ कामडी 
 शैक्षणिक तालुका खोडाला अंतर्गत येणाऱ्या सहा केंद्रातील प्रथम क्रमांक आलेल्या स्पर्धकांमध्ये विविध्द गुनदर्शन स्पर्धा खोडाला येथे पार पडल्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई झोले, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद झोले मोखाडा पंचायत समिती उपसभापती प्रदिपजी वाघ साहेब उपस्थित होते. समूहगीत लहान मोठा गट, भाषण , वादविवाद, आणि नाट्य अशा पाच प्रकारात पार पडलेल्या स्पर्धेत कोचाळे शाळेतील निखिल झुगरे याचा लहान गटात माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा या विषयावर सादर केलेल्या भाषणास प्रथम क्रमांक मिळाला तर लहान गटातील समुहगाणास प्रथम क्रमांक मिळाला , कोचाळे शाळेने सादर केलेल्या स्वच्छ सुंदर पालघर जिल्हा या विषयावरील नाटकास प्रथम क्रमांक मिळाला एकूण पाच प्रकारात पार पडलेल्या स्पर्धेत कोचाळा शाळेने तीन प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले . विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक . दिनकर फसाळे सर , शिक्षक गणेश सुरेश वाघ सर , . राजाराम जोशी सर व दिनेश ठोमरे सर यांनी केले . बक्षीस वितरण प्रसंगी मोखाडा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी . वसंत महाले साहेब केंद्रप्रमुख नागू वीरकर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व विद्यार्थांचे कौतुक केले .

Post a Comment

0 Comments