Advertisement

क्रांतीसुर्य धरतीआबा बिरसा मुडां जयंतीनिमित्ताने ओरपा ता.अक्कलकुवा येथे कार्यक्रम संपन्न


जमाना ऐरिया आदिवासी कर्मचारी मंच व बिरसा मुंडा ॲथलेटीक्स क्लब, ओरपा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ नोव्हेंबर, २०२३ रोजी क्रांतीसुर्य धरतीआबा बिरसा मुडां जयंती ओरपा, पो. जमाना, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली होती. सकाळी ०८.०० वा. ओरपा फाटा येथे मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन भगतसिंग रामसिंग वळवी (मॅरेथॉन धावपट्टू), विठ्ठल नामदेव जगताप (एक्स सुभेदार), सौ. रेखा विक्रम वसावे (प्रा.शि.), लक्ष्‌मण खुमा वसावे (बुलढाणा) यांच्या हस्ते हिरवा झेंडा उभारुन करण्यात आले. वय १५ वर्षे आतिल- मुले (०५ कि.मी.) प्रथम क्र.- रोहित खूमा वळवी, ओरपा द्वितीय क्र.- राहुल भरत वळवी, ओरपा तृतीय क्र.- योगेश पांडुरंग वळवी, सल्लीबार उत्तेजनार्थ- नितेश राजेश वसावे, पाटबारा आणि मुली (०३ कि.मी.) प्रथम क्र.- शकिला बाशा वसावे, नंदलवड द्वितीय क्र.- पल्लीवी रायसिंग वळवी, ओरपा तृतीय क्र.- योगिता संजय वळवी, तलावडी उत्तेजनार्थ- कल्पना शामसिंग वसावे, ओरपा यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते रोख बक्षिस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.  
            ओरपा फाटा ते सोराबारा, ओरपा येथे क्रांतीसुर्य धरतीआबा बिरसा मुडां जयंतीची रॅली आदिवासी पारंपारिक वेषभुषा परिधान करुन, ढोल वाद्य वाजून व घोषणा देऊन मोठ्या संख्येने जल्लोषात काढण्यात आली. जयंती कार्यक्रम स्थळी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व देव मोगरा मातेच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. धरती मातेचे गीत करण पावरा व आदिवासी एकता परिषद धडगांव टिमने गायले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलाखी माकत्या वसावे (माजी पोलीस पाटील) यांनी भुषविले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक गुलाबसिंग बावा वसावे यांनी केले. कार्यक्रमास ॲङ अभिजीत आट्या वसावे (मोहख), सी.के. पाडवी (जि.प. सदस्य), प्रा. महेश सायसिंग पाडवी (सुरगस), के.के. पावरा (धडगांव), शिवलाल वळवी (असली), प्रा. रविदास शंकर पाडवी (कोल्हापूर), करमसिंग सोकना पाडवी (काठी), नारसिंग फुलसिंग पाडवी (मुंबई पोलीस) यांनी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचा इतिहास, आदिवासी चालीरुढी या विषयांवर संबोधले.
            कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून संजय खुमानसिंग वळवी (कोल्हापूर), हिरालाल कर्मा वळवी (ओरपा), डॉ. शंकर आरशी वळवी (वैद्यकिय अधिकारी जमाना), सायसिंग जुन्या वसावे (नंदुरबार), राजू पावरा (धडगांव), जहांगीर डी. वसावे (मोलगी), भगतसिंग रामसिंग वळवी (मॅरेथॉन धावपट्टू) हे उपस्थित होते. सुत्रसंचलन छगन वनसिंग वसावे व अभारप्रदर्शन प्रकाश बळवंत वसावे यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधव, क्रीडा खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments