Advertisement

बिरसा उलगुलान सेना वैजापूर तालुका कार्यकारणी गठीत

छत्रपती संभाजी नगर -आदिवासी समाजाच्या सर्वागिण प्रगतीसाठी, आत्मसन्मानासाठी, अस्तित्व, अस्मिता व जल जंगल ,जमीन संरक्षणासाठी आणि शिक्षण व संस्कृतीक संवर्धनासाठी एका वैचारिक संघटनेची गरज लक्षात घेऊन बिरसा उलगुलान सेना या संघटनेची निर्मिती केली आहे. संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. मधुकर तळपाडे साहेब व महाराष्ट्र राज्य सचिव आदि चिंधू दादा आढळ यांच्या आदेशावरून छत्रपती संभाजी नगर जिल्हा अध्यक्ष आदि शिवाजी भाऊ खुरसने यांच्या नेतृत्वाखाली आज दि. २३-१०-२०२३ रोजी वैजापूर तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली यावेळी खंडाळा येथील सरपंच आदि तुकाराम दादा सोनवणे यांची छत्रपती संभाजी नगर जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली यावेळी उपस्थित जनार्दन दळे , सौ राधा दळे,दिपक गोरे, कृष्णा गायकवाड, किरण दळे, संतोष गोरे, सचिन गोरे ,बबन गायकवाड, इत्यादी पदाधिकारी सदस्य मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments