Advertisement

अक्कलकुवा तालुक्यातील पिपंळखुटा येथे शेतकरी सहायता एक दिवशीय कार्यशाळा उत्साहात संपन्न


 पिपंळखुटा येथील कार्यशाळेमध्ये 115 शेतकऱ्यांनी सहभाग  नोंदविला 

 दि. 13 जून 2023
नंदुरबार : प्रतिनिधी

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या पिपंळखुटा या गावात कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, व आश्रय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सहायता एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत 115 शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.
प्रस्तावना योगेश कहार यांनी केली. अध्यक्षस्थानी  संचालक आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग प्रा. डॉ. आशुतोष पाटील हे होते. त्यांनी विदयापीठ कार्यप्रणाली बाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेत उपस्थितांना निलेश गढरी, तालुका कृषी अधिकारी दिलीप गावित, कृषी पर्यवेक्षक, माकत्या वसावे, यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना, व सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे असे सांगितले. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, शेती पूरक व्यवसाय या विषयासंदर्भात सोखल मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य निर्मला सीताराम राऊत, पंचायत समिती सदस्य अशोकराव राऊत, आपसिंग वसावे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधी सुभाष पवार, आश्रय संस्थेचे अध्यक्ष योगेश कहार, हरिष मोरे, भटू वाघ, शिवदास पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू बैसाणे यांनी तर आभार हरिष मोरे यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments