Advertisement

कृषि विभागामार्फत मौजे पोशेरा येथे म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो अंतर्गत मजगी कामाचे उद्गघाटन.

पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी 
     मोखाडा - गावातील रोजगार म्हटले की ग्रामस्थांना एक आधार म्हणून मिळत असतो कारण गावातच रोजगार मिळाला की माणसांना माणसांना गाव सोडून शहराकडे जाण्याची गरज भासत नाही किंवा लागत नाही म्हणून ही कामे ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध करून देणे खूप गरजेचे असते आणि त्यासाठी ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांचे तसेच इतर काही सहकारी सहकार्य करणारे ग्रामस्थांना रोजगारासाठी काम मिळवून देत असतात अशातच प्रकारे कृषी विभागामार्फत मौजे पोशेरा येथे म. गां. रा. ग्रा. रो. ह. यो अंतर्गत मजगी कामाचे उद्घाटन करून मजुरांना गांव पातळीवर काम मिळावे व मजूर स्थलांतर थांबावे यासाठी विविध विभाग ग्रामपंचायत स्तरावर मजूरींची कामे निर्माण करून,मजुरांना काम उपलब्ध करून देत असतात..त्यानुसार महाराष्ट्र शासन- कृषि विभागामार्फत,तालुका कृषि अधिकारी-मोखाडा कार्यालय अधिनस्त,मौजे-पोशेरा येथे शेतकरी श्री.यशवंत वाघ आणि श्री.रामभाऊ घाटाळ यांच्या क्षेत्रावर, मजगी गट क्रमांक-१ व २ कामाचे नियोजन श्री सतिश बाविस्कर-कृषि सहाय्यक-पोशेरा यांनी करून १७६ मजुरांना काम उपलब्ध करून दिले आहे..
  *सदर मजगी कामांपैकी मजगी गट क्र.१ श्री.यशवंत वाघ यांच्या शेतात मजगी कामाचे उद्घाटन प्रसंगी मा.श्री.मनोहर नवले,सरपंच -पोशेरा,श्री युवराज हाडळ-उपसरपंच-पोशेरा,ग्रा.पं.सदस्य, शेतकरी-लाभार्थी श्री.यशवंत वाघ,श्री.जयराम वाघ-सामाजिक कार्यकर्ते व काम सुरू करणेसाठी श्री.राठोडसाहेब मंडळ कृषि अधिकारी मोखाडा,श्री.जगतापसाहेब कृषि पर्यवेक्षक-पोशेरा,श्री.सतिश बाविस्कर-कृषि सहाय्यक-पोशेरा आणि मजूरवर्ग-पोशेरा उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments