Advertisement

कांगवईतील आदिवासी पाण्यापासून वंचित

1 मे महाराष्ट्रदिनी बिरसा फायटर्सचे उपोषण

दापोली: ग्रामपंचायत कांगवई व पंचायत समिती दापोली तर्फे आदिवासी वाडीतील लोकांकरिता पाण्यासाठी जागेची सोय करण्यात यावी, अन्यथा 1 मे महाराष्ट्र दिनी बिरसा फायटर्स संघटनेतर्फे तहसिल कार्यालय दापोली समोर उपोषण छेडण्यात येईल,असा उपोषणाचा इशारा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी प्रशासनास दिला आहे.
                     निवेदनात म्हटले आहे की, कांगवई गांवातील आदिवासी बांधवांच्या पाण्याच्या प्रश्नावर तहसीलदार व गटविकास अधिकारी दापोली यांना दिनांक 28 मार्च 2023 रोजी निवेदन देण्यात आले होते. परंतू अद्यापही कांगवई येथील आदिवासींचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आला नाही.दापोली तालुक्यातील गांव कांगवई येथील शेताचे स्थानिक नाव सूर्यवंशीचे पाणी या ठिकाणी ग्रामपंचायत कांगवई तर्फे पाण्याची तळी व पाखाडीचे शासकीय काम झालेले असून सदर जागा ओहोळात आहे.या पाण्याच्या तळीतील पाणी आम्ही आदिवासी बांधव पिळ्यानपिळ्या पाणी पित आहेत.परंतु तेथे पाण्यासाठी अडचण निर्माण झाली असून आदिवासी लोकांच्या नांवे कोणत्याही मालकीची जागा नाही.त्यामुळे 15 वा वित्त आयोग सन 2021 /2022 पंचायत समिती स्तर अंतर्गत दुरूस्तीसाठी मंजूरी झालेले 7.50 लाख रूपये परत जाण्याची शक्यता आहे.
                           आदिवासी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे.तसेच पाणी नसल्यामुळे आमच्या शाळकरी मुलांना वेळेवर शाळेत जाता येत नाही.आदिवासी वाडीतील लोकांसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था होणे अत्यंत आवश्यक आहे.तरी ग्रामपंचायत कांगवई व पंचायत समिती दापोली मार्फत अद्यापही पाण्याची सोय करण्यात आलेली नाही.त्यामुळे आमच्या आदिवासी लोकांचे हाल होत आहेत. म्हणून ग्रामपंचायत कांगवई व पंचायत समिती दापोली मार्फत तात्काळ कांगवई गांवातील आदिवासी वाडीतील लोकांकरिता पाण्यासाठी जागेची सोय करण्यात यावी.अन्यथा 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनी बिरसा फायटर्स संघटनेतर्फे तहसिल कार्यालय दापोली समोर उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराच बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments