Advertisement

अजनूप शाळेतील मुली व मुलांचा खो खो स्पर्धेत 2022-23 मध्ये ऐतिहासिक हॅट्रिक विजय

 मोखाडा प्रतिनिधी:सौरभ कामडी 
. ठाणे जिल्हा परिषदच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत शहापूर तालुक्यातील अजनुप जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी दोन्ही संघांनी खो खो स्पर्धेत बाजी मारली आहे. २४ फेब्रुवारी रोजी भिवंडी तालुक्यातील भवाली येथील ऑल सेंट हायस्कूल येथे पार पडलेल्या या खो खो च्या स्पर्धेत मुली अजनूप विरुद्ध भिवंडी तर मुलांचा अजनूप विरुद्ध अंबरनाथ असा सामना रंगला. त्यात अजनूप शाळा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. अजनूप शाळेतील खेळाडू विद्यार्थ्यांचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अजनुप शाळा सलग तिसऱ्यांदा विजेते पदाची दावेदार ठरली आहे. या यशामध्ये विस्तार अधिकारी क्रीडा विभागाच्या प्रमुख सौ. प्राजक्ता राऊत, गट शिक्षण अधिकारी श्री. भाऊसाहेब चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच मार्गदर्शक श्री. महादू मेंगाळ, विशेष सहकार्य श्री. रामचंद्र वायाळ, विश्वास पाटील व प्रशांत तुपे, अजनूप शाळेतील शिक्षकवृंद भरत कोदे, शरद जाधव, दिगंबर पवार, सौ. शोभा महाजन, सौ.अस्मिता तारमळे सौ योगीनी योगेश झारगडे आणि सुलोचना डगळे तसेच जयवंत शेलवले आणि मोरेश्वर उमवणे यांसह व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ आणि पालक व ग्रामपंचायत अजनूप दापूर यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments