Advertisement

शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी छेडले 401 वे उपोषण

*तहसीलदार दापोली व गटशिक्षणाधिकारी दापोली यांची लेखी आश्वासने*

 दापोली: शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी 401 वे उपोषण तहसिल कार्यालय दापोली समोर छेडले आहे. उपोषणाचे निवेदन पावरा यांनी तहसीलदार दापोली वैशाली पाटील यांना दिले होते.त्यावर तहसिलदार दापोली यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती दापोली यांना लेखी पत्राद्वारे निर्देशित केले की,सदरचा अर्ज आपल्या कार्यालयाशी संबंधित असल्यामुळे आपल्या स्तरावर उचित कार्यवाही करून अर्जदार यांना उपोषणापासून परावृत्त करावे.गटशिक्षणाधिकारी दापोली यांनी सुशिलकुमार पावरा यांना कळविले की,जिल्हास्तरावर याबाबत कार्यवाहीसंबंधी आपणास माहिती देण्यात आली आहे.तरी उपोषणासारख्या मार्गाचा अवलंब करू नये ही विनंती.
            दोषी,भ्रष्टाचारी,षडयंत्रकारी, बोगस अपंग प्रमाणपत्रधारक विजय दाजी बाईत व बोगस डिग्रीधारक नंदलाल कचरू शिंदे या दोन शिक्षण विस्तार अधिका-यांना व 31 दोषारोपित तत्कालीन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना सेवेतून बडतर्फ करा,माझी 2 मुळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा,अशा 28 मागण्यांसाठी जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपले 401 वे उपोषण तहसिल कार्यालय दापोली समोर छेडले आहे.
             निवेदनात म्हटले आहे की, विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली हे जिल्हा बदली शिक्षकांकडून प्रत्येकी 22,000/ रूपये घेणे,कामाच्या बदल्यात आर्थिक मागणी करणे,स्वत:कुठल्याही प्रकारे अपंग नसून खोटे अपंग प्रमाणपत्र मिळवून अनेक शासकीय योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करणे, षडयंत्र प्रकरणात स्वत:ला वाचविण्यासाठी आदिवासी शिक्षकांकडून स्वत लिहून ठेवलेल्या पत्रावर व बान्ड पेपरवर जबरदस्तीने दमदाटी करून सह्या करवून घेणे,जाणीवपूर्वक शिक्षकांचा पगार न काढणे इत्यादीं गंभीर प्रकरणात दोषी ठरले आहेत. तसा चौकशी अहवाल मा.गटविकास अधिकारी दापोली, मा.गटविकास अधिकारी गुहागर, मा.शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या त्रिसमीतीय सदस्य समितीने दिनांक 04/10/2018 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सादर केलेला आहे. त्यांच्या विरोधातल्या दिनांक 04/07/2018 व दिनांक 29/10/2018 रोजीच्या दोन्ही चौकशीत चौकशी समितीने विजय दाजी बाईत यांना दोषी ठरवले आहे. विजय दाजी बाईत यांच्या विरोधातल्या 04/07/2018 रोजीच्या चौकशीच्या अनुषंगाने अरुण कदम माजी जिल्हा परिषद सदस्य, राजकीय पदाधिकारी,रामदास कदम माजी मंत्री , समाजकंटक,पालकामार्फत विजय दाजी बाईत यांनी माझ्या विरोधात मोठे षडयंत्र रचून बनावट व खोट्या गुन्ह्यात अडकवले.बनावट प्रकरण पोलिस चौकशीत व बातम्यांद्वारे उघडकीस आले आहे.
               एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या वर सुद्धा 31 प्रकारचे गंभीर दोषारोप आहे.तसेच नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची आग्रा विद्यापिठाची डिग्री शिक्षण विस्तार अधिकारी पदाधिकारी अवैद्य ठरविण्यात आली आहे. तसा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांनी दिलेला आहे. तसेच नंदलाल शिंदे हे महिला कर्मचा-यांचा छळ करणे,अनेक शिक्षकांना त्रास देणे व बोगस डिग्रीत दोषी ठरले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
             माझ्या प्रकरणात तत्कालीन माजी मंत्री रामदास कदम ,माजी जि.प.सदस्य तथा रामदास कदम यांचे भाऊ अण्णा कदम ,राजकीयपदाधिकारी यांचा हात असल्यामुळे मला न्याय मिळण्यास अडचणी निर्माण केल्या जात आहेत. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी उपोषणाचा लढा सुरूच ठेवणार आहे,असा निर्धार उपोषणकर्ते सुशिलकुमार पावरा यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments