👉 लेखनी ही सत्य आणि न्यायासाठी लढणारी तलवार असावी.
👉 दोन नंबर वाले सत्यवादी पत्रकारा विरुद्ध षडयंत्र रचतात.
👉 प्रकाश गर्जनेतुनं नितीन थोरात यांनी मांडली स्पष्ट भुमिका.
नागपूर / चक्रधर मेश्राम. दि 11 सप्टेंबर 2022:-
पत्रकारिता म्हणजे काय? पत्रकार कसा असावा ! खींचो न कमानों को, न तलवार निकालो ! जब तोप मुक़ाबिल हो
तो अख़बार निकालो!!
पत्रकारांची लेखणी ही तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्ट्राचार याविरुद्ध लढताना फक्त लेखणी चालवा, समोरच्याना सत्यवादी लेखनाने घायाळ करा ...असे स्पष्ट मत प्रकाश गर्जनेतुनं नितीन थोरात यांनी व्यक्त केले आहे.
जे पत्रकार खऱ्या बातम्या देण्यास घाबरतात, त्यांनी पत्रकारिता न करता वडापावचा गाडा टाकावा, असे स्पष्ट परखड मतही व्यक्त केले आहे. पत्रकारिता जीवनाची सेवा आहे.ढोंग, विषमता आणि अन्याय ह्यांच्या विरुद्ध उपसलेली ती तलवार आहे. सत्य, समता, आणि स्वातंत्र्य यांच्या आराधनेची ती पूजा आहे. पत्रकारांची लेखणी ही सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या शिपायाची तलवार असली पाहिजे. पत्रकाराच्या लेखणीला तलवारीची धार नसेल, तर सत्य सांगण्याचा आणि न्याय देण्याचा धंदा त्याला यशस्वीपणे करता येणार नाही. त्याने 'पत्रकार' होण्याऐवजी 'पात्रकार' व्हावे! असं आचार्य अत्रे यांनी म्हटलंय .पण आजकाल अर्ध्या हळकुंडात न्याहलेल्या 'पत्रक'कारांनी पत्रकारितेचा धंदा मांडलाय.पत्रकारितेच्या नावावर दुकानदारी सुरू आहे. जो पत्रकार सत्य वागतो, सत्य लिहितो त्याविरुद्ध बदमाश, दलाल राजकारणी षडयंत्र करतात. दुकानदारी करणारे चोरटे पत्रकार एकत्र येतात आणि सत्यवादी पत्रकारा विरुद्ध मोहीम राबवली जाते, दोन नंबर धंदेवाल्यास हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले जातात.अश्या लोकांचे जागोजागी पिक वाढले आहे.त्यात बिनकामाचे तण वाढले आहे, ज्यास चार ओळीची बातमी नीट लिहिता येत नाही, ते पत्रकार म्हणून मिरवत आहेत. समाजाने अश्या लोकांना खड्याप्रमाणे बाजूला ठेवले पाहिजे. जे सत्य लिहितात, अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ....माध्यम कोणतेही असो, कंटेंट महत्वाचा आहे...
मोठा पेपर, मोठे चॅनल हातात असले म्हणजे तो रिपोर्टर मोठा होत नाही !
त्यात आपण किती महत्त्वाचे आहोत, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे !!
किती बातम्यांना न्याय दिला, कोणत्या बातम्यांचा पाठपुरावा केला, यावरच त्या पत्रकाराचे मूल्यमापन ठरते ! केवळ जॉब करणे म्हणजे पत्रकारिता नव्हे, त्याला हाडाचा पत्रकार व्हावे लागते !
जनावरांचे हाड खावून कोणी हाडाचा पत्रकार होत नसतो !
वाघाचे कातडे पांघरून कोणी वाघ होत नसतो, तसेच गळ्यात प्रेसचा कार्ड अडकावून कोणी पत्रकार होत नसतो !
गाडीवर तर कोणीही प्रेस लिहितो, पण हृदयात प्रेस आहे का, याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे !वृत्तपत्र हे लोकांमधे लोकजागृती घडवण्याचे काम करतात, त्यामुळे लोकांची नीतिमत्ता सुधारते. राजकीय सुधारणांना अधिक महत्त्व देण्यापेक्षा सामाजिक सुधारणांना अधिक महत्त्व द्यावे म्हणून प्रत्येक वृत्तपत्र आपले काम करत असतात. मराठीतील सर्वात निर्भीड वृत्तपत्र म्हणून केसरीला गौरविण्यात येते असे लोकमान्य टिळकांनी म्हटले आहे. पत्रकार कसा असावा त्याने निर्भीड पणे आपले मत समाजासमोर मांडावे.काय घडते आहे आपण काय करतो आहे काय दिसते आपल्याला ते समोर आणावे. सरकारवर निशाणा साधत टिळकांनी केसरी या वृत्तपत्राला निर्भीड वृत्तपत्र म्हणून ओळख करून दिली..पण, आजच्या वृत्तपत्रातील पत्रकार निर्भीड आहेत, होते परंतु आता नाही? आणि दिसतही नाही. पत्रकारांचा पोटभरू धंदा सुरू आहे. राजकारणात छटाकभर अस्तित्व असलेल्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मत नाही.
पत्रकारांनी प्रवाहाच्या बाजूने वाहून न जाता निर्भिडपणे सदसविवेकबुद्धी वापरून जागृत ठेवून काम करावे. ज्यांना स्वतःचा आवाज नाही, त्यांचा आवाज होऊन मुक आवाजाला निर्णय करण्यापर्यंत लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करावे.पत्रकारांची नजर शोधक आसली पाहिजे, पत्रकारांनी सत्य, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्ह तीन बाबी समोर ठेवून लोकांना नवी दृष्टी द्यावी, लोकांना, समाजाला डोळस करावे, पत्रकारांनी लोकप्रिय समजुती धुडकाव्यात आपल्या पत्रकारितेची चिकित्सा करावी. त्यामुळे पत्रकार समाजातील काही दुर्बल घटकांना त्यांच्या हितसंबंधांना धक्के देताना दिसतात.पण असे धक्के स्वीकारण्याची ज्या समाजाची मानसिकता नसते, तो समाज कधीही विकसित होऊ शकत नाही.पत्रकार खरंच आपले कर्तव्य समर्थपणे जेव्हा पूर्ण करत असतात तेव्हा राजकीय व्यवस्था त्यांच्या बाजूने उभी राहत नाही.पत्रकारांनी मुक्त पत्रकाराचे शिक्षण जरी घेतले तरी ते मुक्त नाही होऊ शकत.पूर्वीच्या काळात समाजात जागृती निर्माण करण्याचे काम वृत्तपत्रांनी केले.पत्रकारितेला एक आगळेवेगळे महत्त्व होते. आज अग्रलेख किती वाचतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.पत्रकारिता सौम्य होत चालली आहे. पत्रकारांनी त्यांच्या साधनांचा उपयोग भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी केला पाहिजे, परंतु आज असे होताना दिसत नाही .कुठे तरी त्यांना चौकटीत उभे राहावे लागते.उदा.म्हणजे काही घटकांवर लिहायचे ठरले म्हणजे त्यांच्यावर हल्ला होणार , परिवारावर समस्या येणार.नाराजी ओढवून घ्यावी लागते. आपल्या लोकशाही व्यवस्था असणाऱ्या देशात पत्रकार सुरक्षित आहे का? त्यांचे जीवन सुरक्षित नाही. दहशतवाद राजकारण समाजकारण यांच्या हितसंबंधांना थोडाही धक्का पोहचला की पत्रकारांना त्यांचा जीव गमवावा लागतो.महाराष्ट्र सरकारने पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी कायदा मंजूर केला आहे पण अजून तो कायदा मंजूर झाला नाही.पूर्वीच्या काळात समाजात जागृती निर्माण करण्याचे काम वृत्तपत्रांनी केले.पत्रकारितेला एक वेगळे महत्त्व होते. आज अग्रलेख किती वाचतात असा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजाचा आरसा,सतत कार्यमग्न असलेल्या पत्रकारांना निर्भिड होऊन झालेल्या अन्यायाला वाचा फोडणे हाच खरा पत्रकार .
(लेखक :- नितीन थोरात मुख्य संपादक दैनिक प्रकाश गर्जना प्रतिनिधी. मू.पो.व्याड ता.रिसोड जिल्हा वाशिम)
0 Comments