Advertisement

*जागतिक आदिवासी दिन आणि मंथन*

 एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ 
तिरोडा:-(१३ आँगष्ट) आदिवासी दिनाचे अौचित्य  गोंदिया जिल्हा स्तर तिरोडा येथे नुकतेच विश्व मुलनिवासी दिन साजरा करण्यात आला यावर विचार व मंथन करतांनी प्रसिध्दी व सांस्कॄतिक बाबीवरून विशेष समाजात सुधारणा करून चिंतण मंथन करण्याची गरज सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी बांधवासमोर सल्ला दिला आहे.
          जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी होय. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत त्या सगळ्यांचे निर्माते आदिवासी बांधव आहेत. हेच पृथ्वीचे मूल निवासी आहेत. अनेक आदिवासी जमाती, निसर्ग पूजक आहेत व भारतात वास्तव्य करीत आहेत. आज वर्तमानात मात्र या मूलनिवासी आदिवासिंनाच परकं ठरवून हक्क - अधिकारापासून वंचित करून त्यांना गुलाम केल्या जात आहॆ. जल - जंगल - जमिनीचा एकेकाळी मालक आणि संरक्षक असलेल्या आदिवासी - मुलनिवासिंना वनवासी ठरवून त्यांची जी जगण्याची साधनं आहेत ते हिसकावून त्यांना संपवीण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.

 आदिवासी बांधवांची संस्कृती, आचारधर्म हॆ या भारताची मूळ विचारधारा आहे. एकेकाळी तीच आम्हा भारतीयांची जगण्याची जीवनशैली होती. मात्र वैदिक - आर्य - सनातनी यांनी भारतावर आक्रमण केले तेव्हा पासून या आमच्या समतावादी आदिवासी जीवनशैलीला संपविण्याचा प्रयत्न करून आमच्यावर विषमतावादी असणारी वैदिक व्यवस्था -आर्य धर्म थोपवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यात बऱ्यापैके ते यशस्वी होत आहेत. प्राचीन काळा पासून त्यांनी आम्हा मूलनिवास्यांवार त्यांचा धर्म लादत असतांना आमच्या पूर्वजानी तो नाकारून त्या विरुद्ध प्रचंड आंदोलन केला, लढा दिला आणि तो लढा आजही सुरु आहे. वर्तमान लोकशाही शासन व्यवस्थेत मात्र अल्प प्रमाणात का असेना आम्ही शिक्षण घ्यायला लागलो शिकत आहोत. परंतु हॆ शिक्षण आम्ही फक्त वैक्तिक स्वार्थ - वैक्तिक विकासाकरिता घेत आहोत.

 असं वाटतं. कारण आमच्या ज्या पूर्वजांनी वैदिक व्यवस्थे विरुद्ध लढा दिला त्याच व्यवस्थेचा स्वीकार करण्यास आमचा शिकलेला परंतु न पिकलेला साक्षर वर्ग पुढे आहे. ही आम्हा आदिवासी बांधवाची शोकांतिका आहे. विद्वतेत आणि कलेत निष्णात असलेल्या आमच्या एकलव्याला शिक्षण फक्त नाकारलचं नाही तर भविष्यात यांनी कोणतंही शिक्षण घेऊ नये कपट नितीचा वापर करून वैदिक व्यवस्थेने द्रोणाचार्य - पांडव आणि कौरवाच्या हातून त्याचा अंगठा कापून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिकरापासून वंचित केले. आम्ही मात्र आमच्या एकलव्याचा लढा समजून न घेता, आपला इतिहास न वाचता द्रोणाचार्याचा उदो उदो करण्यात दंग आणि व्यस्त आहोत. ज्या द्रोणाचाऱ्याने शिक्षण घेणारा आमचा अंगठा कापला त्याच द्रोणाचार्य आणि अर्जुनाच्या नावाने आदिवासिंच्या छाताडावर पाय ठेवून क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम प्रशिक्षिक आणि खेळाडूंचा पुरस्कार दिल्या जात असतांना त्या विरुद्ध आवाज उठवीण्याची सादी तसदी आम्हाला घ्यावी वाटत नाही. एकलव्याच्या नावाने पुरस्कार देण्याच्या मागणीचा आम्ही साधा निवेदन लिहू शकत नाही तर आमच्या त्या लिहता येण्याला काय अर्थ आहे.
     आदिवासी म्हणून आम्हा मूलनिवासिंचे अनेक प्रश्न आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना आमचे मूलभूत प्रश्न या 75 वर्षात अजून तसेच आहेत. देशात 'घर - घर तिरंगा' अभियान मोठा गाजावाजा करत थाटात साजरा केल्या जात असतांना मात्र देशातील श्रमकरी, शेतकरी, आदिवासी यांना जिथं रहायलाचं घर नाही तिथे माझा अस्मिता, स्वाभिमान, माझ्या देशाची शान असलेला तिरंगा ध्वज आता घर नसलेल्या मला माझ्या छातीवर लावायला लागेल. कारण मला घर नसतांना तो लावला नाही तर मला देशद्रोही ठरविल्या जाईल याची भीती मनात आहे.
        एकेकाळी जल - जंगल - जमिनीचा मालक असेलेल्या आम्हा आदिवासिंना अनेक मूलभूत प्रश्न सोबत घेऊन आदिवासी दिन साजरा करावा लागत आहॆ. अपेक्षा एवढीच आहे स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव येइपर्यंत हा देश भांडवलदरांना विकल्या गेला नाही तर निदान तेव्हा पर्यंत आमचे मूलभूत प्रश्न सुटतील अशी अपेक्षा ठेवून.....
       आदिवासी दिनाच्या समस्त मूलनिवासी बांधवाना हार्दिक सदिच्छा....
#आदिवासीदिन 
#aadiwasidin.

Post a Comment

0 Comments