Advertisement

आदिवासी महिलेवर मंत्रोच्चारात अभिषेक म्हणजे आदिवासी समाजाचे हिंदूकरण करण्याचे भाजपाचे हे षडयंत्र आहे.?

आदिवासी महिलेवर मंत्रोच्चारात अभिषेक म्हणजे आदिवासी समाजाचे हिंदूकरण करण्याचे भाजपाचे हे षडयंत्र आहे.?
राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर मंत्रोच्चारात अभिषेक केल्याने आदिवासी समाजात नाराजी

राज्प्रय तिनिधी -
 एसके जी पंधरे  AKN महाराष्ट्र  प्रदेश.सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ ( भारत सरकार मान्य)
               


नागपूर: Anchor :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेण्याच्या एक दिवस आधी त्यांच्यावर मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात आल्याची कथित चित्र- फीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यामुळे आदिवासी समाजात व गणमान्यावरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.आदिवासी समाज निसर्गवादी असून तो हिंदूच्या देव-देवतांना मानता नाही,आदिवासींची पूजा पद्धती देखील वेगळी आहे. परंतु अशाप्रकारे आदिवासी महिलेवर मंत्रोच्चारात अभिषेक म्हणजे आदिवासी समाजाचे हिंदूकरण करण्याचे हे षडयंत्र आहे, अशी तीव्र भावना आदिवासी भाषा संशोधन केंद्राच्या संचालिका उषाकिरण आत्राम यांनी व्यक्त केल्या. तर, या देशात संविधानाने सर्वाना समान हक्क दिले आहेत. एखादी व्यक्ती राष्ट्रपती पदासारख्या सर्वोच्चपदी पोहोचते तेव्हा जात-धर्म हे बाजूला राहतात. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांच्या समोर मंत्रोच्चाराची गरज नव्हती.द्रौपदी मुर्मू यांनी देखील ते करवून घ्यायला नको होते. त्यांनी त्यास नकार न देणे म्हणजे त्यांनी कोणाची तरी मानसिक गुलामगिरी स्वीकारल्याचे ते द्योतक आहे. राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजप संपूर्ण आदिवासी समाजाला आपल्या कवेत घेऊ पाहत आहे. त्यांचा आदिवासींना मानसिक गुलाम करण्याचा प्रयत्न आहे, अशीही आत्राम यांनी खोचक टिका केली......

BYTE :- उषाकिरण आत्राम, संचालिका,आदिवासी भाषा संशोधन केंद्र

Post a Comment

0 Comments